वासुदेव पागी, पणजीः आसगाव येथील घराच्या मोडतोड प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेली पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने मंजूर केला. यामुळे तूर्त पूजा शर्मा हिची अटक टळली आहे.
आसगाव येथे बाऊन्सर वापरून बांधकाम मोडण्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेली पूजा शर्मा हिला खंडपीठाने दिलासा दिला आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयाचा आदेश खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे. मात्र तिला तपास कार्यात तपास अधिकाऱ्याला सहकार्य करण्मयास सांघण्मयात आले आहे. २२ जुलै रोजी पूजा शर्माला एसआयटीपुढे हजर रहावे लागणार आहे. तसा आदेश न्यायालायने दिला आहे. तपास अधिकाऱ्याने तिला अटक केली तरी ५० हजार रुपयांच्या वैयक्तीक हमीवर तिची मुक्तता करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे.
आसगाव येथील कथित बांधकामाची मोडतोड करण्यात आली होती तेव्हा पूजा शर्मा ही गोव्यात नव्हतीच ती मुंबईत होती असा युक्तिवाद पूजा शर्मा हिच्या वकिलाने केला होता. हा युक्तिवाद प्रभावी ठ रला आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज पणजी प्रधान सत्र न्यायालयाने फेटाळला होता. सत्र न्यायालयाच्या आदेशाला तिने खंडपीठात आव्हान दिले होते.