Goa Assembly Election 2022: "शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 01:39 PM2022-01-15T13:39:23+5:302022-01-15T13:39:49+5:30

उत्पल पर्रिकरांचं योगदान काय, यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?, राऊत यांचा सवाल.

Goa Assembly Election 2022 Shiv sena leader sanjay raut speaks about how they fight for seats tmc ncp bjp aap | Goa Assembly Election 2022: "शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण"

Goa Assembly Election 2022: "शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण"

Next

Goa Assembly Election 2022 : निवडणूक आयोगानं (Election Commission) आगामी विधानसभेच्या निवडणुकांची (Assembly Elections) घोषणा केल्यानंतर सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस हा पक्षही उतरल्यानं त्याचा फटका काँग्रेसला बसेल का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, गोवा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका काय याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. सध्या शिवसेनेची १० जणांची यादी तयार आहे. परंतु अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या ठिकाणी आल्यावर आम्ही चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ असं ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीदेखील एक टीम यासाठी पाठवली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मुंबईतील प्रमुख लोक या ठिकाणी येऊन काम करतील आणि मार्गदर्शनही करतील. निवडणुकीला पुढे घेऊन जातील, असंही राऊत म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "तृणमूल काँग्रेसचे इकडचं काम पाहणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहे. पण यात त्याग कोणी करायला तयार नसतं. प्रत्येकाला दुसऱ्यानं त्याग करावं असं वाटतं. या सगळ्या वादात पडू नये असं ठरवलं आहे. आम्ही ज्या काही जागा लढवतोय त्यापैकी काही जागांवर अधिक लक्ष देऊ," असंही ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

"शिवसेनेमधून लढणारे सर्वच आम आदमी आहेत. आमच्याकडे ओरिजनल आम आदमी आहेत. साफ करण्यासाठी आमच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाणही आहे," असं राऊत आम आदमी पक्षाबद्दल बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी उत्पल पर्रिकर यांच्याबाबत भाजपनं घेतलेल्या भूमिकेवरही मत व्यक्त केलं. 

गोवा ही देवभूमी
"गोवा ही देवभूमी आहे. त्यांच्या तोंडी कायमच नैतिकतेचं भजन असतं. आज भाजपकडे जे गोव्यात उमेदवार आहेत, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे, माफियागिरीचे आरोप आहेत. काही ठिकाणी त्यांनी अफू, चरस गांजाचा व्यापार करणाऱ्या लोकांना पक्षात घेतलंय. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?," असाही सवालही त्यांनी केलं. फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे, फडणवीसांकडून अशी अपेक्षा नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

Web Title: Goa Assembly Election 2022 Shiv sena leader sanjay raut speaks about how they fight for seats tmc ncp bjp aap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.