शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी शक्य; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार?, पर्रीकर कुटुंबातलं पहिलं बंड ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 8:53 AM

पक्षाचे टेन्शन वाढले; यादीकडे नजरा

वासुदेव पागी

पणजी : भाजपची उमेदवार यादी बुधवार, दि. १९ रोजी जाहीर होणार असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बहुतेक मतदारसंघात एकपेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे भाजपची उमेदवार यादी जाहीर होताच किमान आठ मतदारसंघात पक्षांतर्गत मोठी फूट पडण्याची पूर्ण शक्यता आहे. फुटीच्या उंबरठ्यावर काणकोण, सावर्डे, प्रियोळ, कुंभारजुवे, पणजी, मांद्रे, सांताक्रूझ व सांगे हे मतदारसंघ आहेत. यादी जाहीर झाल्यानंतरची भूमिकाही अनेकांनी ठरवली असून बंड झाल्यास ते शमवणे भाजपला नक्कीच जड जाणार आहे.

काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडीस आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. शुक्रवारी तवडकर आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत उभयतांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला उघड संघर्ष हा या रस्सीखेचचा परिपाक आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षांतर्गत संघर्षाचा स्फोट होणे अटळ आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित ७० कोटींचा नोकरभरती घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी सावर्डे मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांचेच नाव होते. परंतु आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कथित घोटाळा उघडकीस आणल्यानंतर या मतदारसंघात माजी आमदार गणेश गावकर यांचे नाव पुढे आले. उमेदवारी दोघांपैकी एकाला मिळणार असून त्यामुळे एकाची बंडखोरी निश्चित आहे.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आपल्या पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगे मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, सांगेसाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने या मतदारसंघातही उमेदवारीच्या मुद्यावरून गृहकलह उफाळून येणार आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले गोविंद गावडे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास भाजप केडरचे संदीप निगळ्ये यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षात निमंत्रण देऊन भाजपची उमेदवारी बहाल केलेले कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना यावेळी उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल खुद्द मडकईकर यांना खात्री नाही. तसेच सिद्धेश नाईक आणि रोहन हरमलकर हेही उमेदवारीसाठी आटापिटा करीत आहेत. पक्ष केडर शिस्तीत असलेले सिद्धेश नाईक उमेदवारी नाकारल्यास बंड कदाचित करणार नाहीत पण त्यांचे समर्थक बंड करू शकतात. भाजप अंतर्गत सर्वेक्षण अहवालाच्या आधारावर सांताक्रूज मतदारसंघात टोनी फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारली तर तेही स्वस्थ बसणार नाहीत, हे निश्चित आहे. 

मायकल लोबो यांना पर्याय म्हणून भाजपमध्ये घेतलेले गुरू शिरोडकर यांना डालवून आता टिटोसचे मालक रिकार्डा डिसोझा यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. त्यामुळे इथेही शिरोडकर समर्थक बंडखोरी करू शकतात.

शिफारशींचा फार्स?भाजपने मतदारसंघात पहिल्यांदा मंडल समितीकडून मतदानाने शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे उमेदवारीसाठी पाठविली. प्रत्यक्षात ही खरोखरच पारदर्शक प्रक्रिया आहे की फार्स आहे, याबद्दलही शंका आहे. अनेक ठिकाणी मंडल समितीला नको असलेल्यांची नावेही पक्षाने उमेदवारीसाठी केंद्रात पाठविली आहेत.

पर्रीकर कुटुंबातले पहिले बंडगोव्यात भाजप ज्या कुटुंबांनी उभा केला त्या कुटुंबियांपैकी एक असलेले स्व. मनोहर पर्रीकर कुटुंबिय. आज त्याच कुटुंबातील उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून उमेदवारीवर मोठा दावा केला आहे. तसेच पक्षाने त्यांचा दावा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे उत्पल बंडाचा झेंडा हाती घेतील. बाबूश यांनाच भाजप तिकीट देणार असल्याने उत्पल यांनी बंड केल्यास ती राष्ट्रीय स्तरावरही मोठ्या चर्चेची घटना ठरेल. 

डोकेदुखी ठरणारे मतदारसंघ

  • पणजी 
  • काणकोण
  • सावर्डे
  • प्रियोळ
  • कुंभारजुवे
  • मांद्रे
  • सांताक्रूझ 
  • सांगे 

भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. यादी एकाच टप्प्यात किंवा दोन टप्प्यातही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. - सदानंद शेट तनावडे, प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाcongressकाँग्रेस