पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचे उमेदवार १२ मतदारसंघात पुढे आहेत. या निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी गोव्याचा दौरा केला होता. आदित्य यांनी चार मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार केला. या चारही मतदारसंघात शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. विशेष म्हणजे या चारही उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला दुपारी १ पर्यंत अडीचशे मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
आदित्य ठाकरे साखळी, वास्को, पेडणे, म्हापसा मतदारसंघात प्रचाराला गेले होते. आदित्य यांनी प्रचारसभा घेतल्या, भाषणं केली. काही ठिकाणी डोअर टू डोअर प्रचार केला. मात्र तरीही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार झाला. विशेष म्हणजे या ठाकरेंनी प्रचार केलेल्या चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आदित्य ठाकरेंनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काय स्थिती?साखळी मतदारसंघप्रमोद सावंत, भाजप- ११५६१ मतंधर्मेश सगलानी, काँग्रेस- १११७५ मतंसागर धारगळकर, शिवसेना- ९७ मतंनोटा- २७८ मतं
वास्को मतदारसंघकृष्णा साळकर, भाजप- ११,६५४ मतंजोस अल्मेडा, काँग्रेस- ८२०४ मतंमारुती शिरगावकर, शिवसेना- ४९ मतंनोटा- २१३ मतं
पेडणे मतदारसंघप्रविण आर्लेकर, भाजप- १२६१४ मतंराजन कोरगावकर, काँग्रेस- ९३२६ मतंसुभाष केरकर, शिवसेना- २२२ मतंनोटा- ३६१ मतं
म्हापसा मतदारसंघजोशुआ पीटर डिझुझा, भाजप- ९६४२ मतंसुधीर कांदोळकर, काँग्रेस ७५५९ मतंजितेश कामत, शिवसेना- ११९ मतंनोटा- २८४ मतं