Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:49 AM2022-03-10T10:49:38+5:302022-03-10T10:50:04+5:30

साखळीत यावेळी ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते.

Goa Assembly Elections 2022 Result: Goa Chief Minister Pramod Sawant is lagging behind, according to initial figures | Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

Next

 

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतमोजणीच्या दुसºया फेरीअंती काँग्रेशचे धर्मेश सगलानी यांच्यापेक्षा ४१७ मतांनी पीछाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक निकाल काही तासातच अपेक्षित आहेत. चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर व मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे.

साखळीत यावेळी ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते. हा कौल प्रस्थापिताविरुध्द असल्याचा तसेच मतदारसंघातील लोकांनी सावंत यांच्या विरोधात असल्याचा दावा केला जात होता. केंद्रात भाजपचे सरकार असूनही सावंत हे राज्यात बंद असलेला खाण व्यवसाय सुरु करु शकले नाहीत. तसेच नोकऱ्याही देऊ शकले नाहीत याबद्दल चीड होती.

कवळेकर हे केपें मतदारसंघातून तर आजगांवकर हे मडगांव मतदारसंघातून रिंगणात आहेत. २0१९ साली कवळेकर हे काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये तर आजगांवकर हे मगोपमधून भाजपमध्ये गेले होते. आजगांवकर हे एरव्ही पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढवत असत. परंतु यावेळी भाजपने त्यांना पेडणेंत तिकीट नाकारली आणि मडगांवमध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशी टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरविले. परंतु हा बदल आजगांवकर यांना महागात पडला.

सध्याची आघाडी

भाजप   १८
काँग्रेस  १२
मगोप-तृणमूल   ५
अपक्ष    ३
इतर   २

एकूण जागा  ४0 

Web Title: Goa Assembly Elections 2022 Result: Goa Chief Minister Pramod Sawant is lagging behind, according to initial figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.