- नारायण गावसपणजी - या आठवड्यात तापमान ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान ते ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे.
गुरुवारी हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान होते. गुरुवारी पणजी येथे कमाल ३४.४ अंश तर किमान २४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगावात कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस झाले होते. मुरगावातील किमान तापमान २५.० अंश नोंद करण्यात आले.
उष्णतेचा आरोग्यावर परिणामया वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लाेकांना केले आहे.