शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

Pramod Sawant: १०० दिवसांत करून दाखवलं! गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 4:07 PM

Pramod Sawant: आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर थांबवल्याचा दावा केला आहे. गोवा सरकारने १०० दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. एका कार्यक्रमात प्रमोद सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यात, भारतीय जनता पक्षाच्या 'डबल इंजिन की सरकार'च्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रमोद सावंत म्हणाले की, आमच्या सरकारने धर्मांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेले धर्मांतर थांबले आहे. बेकायदेशीर भूसंपादन प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे, असे सावंत म्हणाले. याआधीही त्यांनी राज्यातील जनतेला धर्मांतराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

अशा परिस्थितीत चुकूनही धर्मांतर होता कामा नये

यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते की, पुन्हा एकदा धर्मावर हल्ला होत आहे. मी खोटे बोलत नाही. गोव्यातील अनेक भागात लोक धर्मांतराकडे जात असल्याचे आपण पाहिले आहे. काही गरीब आहेत, काही संख्येने कमी आहेत, काही मागासलेले आहेत, काहींना अन्न किंवा नोकरी नाही अशा विविध गोष्टींचा फायदा घेत आहेत. अशा परिस्थितीत चुकूनही धर्मांतर होता कामा नये, असे आमचे म्हणणे आहे.

दरम्यान, गोवा सरकार कधीही धर्मांतराला परवानगी देत ​​नाही, पण तरीही मला वाटते की, लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गावातील मंदिर ट्रस्टने सतर्क राहण्याची गरज आहे, कुटुंबांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ६० वर्षांपूर्वी आम्ही 'देव, धर्म आणि देश' म्हटले होते आणि याच भावनेने पुढे गेलो होतो. जर आपला देव सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित असेल आणि आपला धर्म सुरक्षित असेल तर आपला देश सुरक्षित असेल, असेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत