पणजी : गेल्या पाच महिन्यांच्या खंडानंतर राज्याच्या सीमा आज मंगळवारपासून खुल्या होत आहेत. कोणतेही र्निबध न ठेवता सीमा खुल्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्यातील बार व रेस्टॉरंट्स देखील आजपासून खुली होत आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सायंकाळी याबाबतची घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्रलयाच्या नव्या प्रक्रियेनुसार राज्याच्या सीमा मंगळवारपासून खुल्या होतील. सर्व प्रकारच्या वाहनांना गोव्यात येऊ दिले जाईल. कोविडची चाचणी केली जाणार नाही. केंद्रीय गृह मंत्रलयाची सर्व नवी मार्गदर्शक तत्त्वे गोव्याला लागू होत आहेत. त्या तत्त्वांचे पालन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. बाहेरून आत येणा:यांच्या कोविड चाचण्या होणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले.
राज्यातील मद्यालये सुरू करावीत अशी मागणी मद्य व्यवसायिक अलिकडे सातत्याने करत होते. बार व रेस्टॉरंट्स सुरू होत असली तरी, प्रत्येकाने सोशल डिस्टनसींगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. मंदिरे, चर्च, मशिदींच्या ठिकाणी प्रार्थनेला जातानाही लोकांनी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनसींगचे पालन करावे. शाळा कधी सुरू होतील ते अजून ठरलेले नाही. महिनाभर तरी सुरू होऊ शकणार नाही. दि. 21 सप्टेंबरनंतर काय तो निर्णय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चतुर्थीनंतर संख्या वाढली-
गणोश चतुर्थीवेळी लोकांनी सोशल डिस्टनसींग पाळले नाही. विरोधकांनी हे लक्षात घ्यायला हवे. गणोश चतुर्थीवेळी लोकांनी सोशल डिस्टनसींग न पाळल्याने दोष देवाला जात नाही, दोष आम्हा लोकांनाच जातो. काही विरोधक कुठचा मुद्दा कुठेही लावतात व टीका करतात. गणोशोत्सव उत्साहाने साजरा करावा असे मी म्हणालो होतो पण गर्दी न करता सोशल डिस्टनसींग पाळणो ही लोकांची जबाबदारी असून ती पार पाडली गेली नाही. गणोश चतुर्थीपूर्वी कोविड रुग्ण संख्या कमी होती व चतुर्थीनंतर संख्या वाढली ही वस्तूस्थिती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इफ्फी वच्यरुअल पद्धतीने होईल असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल नमूद केले.
रुग्ण फोंडय़ात हलविले-
दरम्यान, मडगावचे ईएसआय इस्पितळ भरलेले आहे. गोमेकॉतही अनेक रुग्ण आहेत. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात पूर्वी अर्भकांनाच ठेवले जात होते. आता तिथे अन्य प्रकारचेही कोविड रुग्ण ठेवले जातील. आजपासून तिथे रुग्ण हलविण्यास सुरूवात झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोविड व्यवस्थापनाच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, डीन वगैरे बैठकीत सहभागी झाले. विविध आजार असलेले रुग्ण देखील मडगावच्या ईएसआय इस्पितळात ठीक झाले आहेत. पंधराहून जास्त प्रसुती कोविड इस्पितळात झाल्या व मुलांसह त्या माता सुखरूप घरीही परतल्या असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.