शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

गोव्यात नववर्षाची धूम, नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 8:54 PM

गोव्यात रविवारी 31 रोजी रात्री सर्वत्र नववर्ष साजरे करण्याची धुम असेल. नववर्षानिमित्त जोरदार पाटर्य़ा आणि संगीत रजनीचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत.

पणजी : गोव्यात रविवारी 31 रोजी रात्री सर्वत्र नववर्ष साजरे करण्याची धुम असेल. नववर्षानिमित्त जोरदार पाटर्य़ा आणि संगीत रजनीचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. विशेषत: किनारपट्टी आकर्षक रोषणाईने पूर्णपणो सजली व फुलली आहे.  लाखो पर्यटकांच्या साक्षीने आज रात्री गोमंतकीय आणि पर्यटकही नववर्ष साजरे करतील.गोव्यात सध्या जगभरातील लाखो पर्यटक आलेले आहेत. या शिवाय देशातील उद्योग जगतातील मान्यवरांसह राजकीय नेते, बॉलिवूडमधील सिने तारे, क्रिडापटू वगैरे गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी दाखल झाले आहेत. तारांकित हॉटेलांनी नववर्षाच्या स्वागतासाठी खास संगीताचे कार्यक्रम आणि मेजवान्या आयोजित केल्या आहेत. किनारपट्टीतील हॉटेलांमध्ये सध्या रिकाम्या खोल्याच उपलब्ध नाहीत. काही पंचतारांकित हॉटेलांमध्ये दि. 31 रोजी हॉटेल खोलीचा भाडेदर पन्नास ते ऐंशी हजार रुपये आहे. यात मेजवानी व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांचे शुल्क आले. मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंवरही आजची रात्र कार्यक्रमांनी गाजणार आहे. किनारपट्टीत वाहतुकही प्रचंड वाढली आहे. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ताण आलेला आहे. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर पर्यटकांची वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या अनुभवास येत आहे. श्ॉक व्यवसायिकांनीही दि. 31 रोजी रात्री किना:यांवर संगीताचे कार्यक्रम ठेवले आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरे राज्यांतील उद्योजक, आजी-माजी मंत्री तसेच काही निवृत्त न्यायाधीश नव वर्ष साजरे करण्यासाठी सहकुटूंब गोव्यात दाखल झाले आहेत. मिरामार, कांदोळी, कळंगुट, सिकेरी, बागा, मांद्रे, आश्वे, कोलवा, पाळोळे अशा किना:यांवर आज मध्यरात्री गोमंतकीय व पर्यटक जमून नववर्षाचे स्वागत करत असल्याचे चित्र पहायला मिळेल. मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्यावर्षाचे स्वागत अशा टप्प्यावर राज्यात आनंदाचा माहोल आहे. सरकारचे प्रशासन अगोदरच सुट्टीच्या मूडमध्ये आहे. नाताळ सणापासून अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले आहेत. दि. 1 जानेवारीला ते रुजू होतील. नाताळानिमित्त शाळांना सुट्टी होती. दि. 2 जानेवारीपासून राज्यातील सगळी विद्यालये नव्याने खुली होतील.नववर्षानिमित्ताने राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा व इतरांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :goaगोवाNew Year 2018नववर्ष २०१८