नरेश डोंगरे / आशिष रॉय
मांडवीच्या पात्रात कैसिनो थाटून गोव्याला मगरमिठी घालणाऱ्या आणि अनेकांना पुरते उद्ध्वस्त करणाऱ्या कॅसिनो माफियांनी आता आजूबाजूच्या राज्यांवरही अप्रत्यक्षपणे चाल केली आहे. चढत्या रात्रीला जुगारात कोट्यवधींची उलाढाल करणारे प्रत्यक्ष गोव्यातील कमी आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक तसेच अन्य प्रांतांतील लोक अधिक असल्याचे दिसून येते. या जुगाऱ्यांच्या गर्दीत सराईत गुन्हेगारांची संख्या मोठी असते.
कॅसिनो लेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजीच्या मार्गावर रोज सायंकाळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातील खासगी वाहनांची रांग लागलेली असते. आतमध्येही याच राज्यांमधील वेशभूषा व केशभूषा असलेली मंडळी जुगाराच्या टेबलांवर दिसतात.कॅसिनोच्या नावावर जुगार खेळण्यासाठी येणान्यांमध्ये देशभरातील लहान, मोठे बुकी, अट्टल जुगारी तसेच कुख्यात गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांची संख्या मोठी असते. खासगी वाहनात नोटांची बंडले घेऊन ही मंडळी येतात आणि जुगाराची हौस पूर्ण करून घेतात.
घायाळ करणाऱ्याा बाला आणि 'व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी?
> जुगार, मद्यपान किया उपाहारगृहाचा परवाना कॅसिनो संचालकांनी घेतला असावा, असे गृहीत धरले तरी येथे ज्या प्रकारे मनोरंजनाच्या नावाखाली तोकड्या कपड्यातील डान्स करविले जातात, त्याचा परवाना आहे की नाही, ते स्पष्ट होत नाही.
> सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने येथे तोकड्या कपड्यातील ललनांचा डान्स होतो. हिट अँड हॉट गाण्यावर या नृत्यांगनाची अदा मोठी रक्कम हारलेल्या जुगात्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी ठरते.
> या बिनधास्त वाला व्हाय घिस कोलावरी कोलावरी डी असे म्हणत मौजमजा करण्यासाठी आलेल्यांना घायाळ करतात.
'त्या' कोण, कुठल्या?, काहीच पत्ता नाही...
येथील तरुणीचे एकूणच वर्तन अनेकांची विकेट घेणारे असते. त्या कोण, कुठल्या येथे कशा पोहोचल्या त्याबद्दलची माहिती कोणी सांगत नाही. मात्र, नियमित ग्राहक असलेल्यापैकी अनेकजण दारूच्या नशेत त्यांच्याबाबत बरळतात. काहीजणी रशियन, नेपाळ तर काहीजणी भूतान, उझबेकिस्तान या देशासह वेगवेगळ्या ठिकाणच्या असल्याचे सांगितले जाते.