शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

गोवा : गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कळंगुट भागात असणार सीसीटीव्हीची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 12:17 PM

किनारी भागात खास करुन कळंगुट, कांदोळी भागात वाढत्या गैरप्रकारांवर आवर घालण्यासाठी या भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच राखीव दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

म्हापसा (पणजी) - किनारी भागात खास करुन कळंगुट, कांदोळी भागात वाढत्या गैरप्रकारांवर आवर घालण्यासाठी या भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच राखीव दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी या संबंधीची माहिती दिली. कळंगुट, कांदोळीसारख्या किनारी भागात वाढता पर्यटकांचा संचार लक्षात घेऊन या भागात होणा-या गैरप्रकारातसुद्धा बरीच वाढ झाली आहे. 

स्थानिक तसेच पर्यटक यांच्यात वारंवार होणारी मारामारी, भांडणे सारख्या प्रकारात झालेल्या वाढीबरोबर अमली पदार्थांच्या विक्रीतही बरीच वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात तर पोलिसांनी केलेल्या कारवाई ब-याच प्रमाणावर अमली पदार्थसुद्धा जप्त केला होता. घडत असलेल्या या प्रकारावर लोबो यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती दिली. मागील काही महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उल्लेख करुन लोबो यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्हींचं कवच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. कळंगुट भागातील सिकेरीपासून ते बागापर्यंत मोक्याच्या ठिकाणी असे कॅमेरे लावले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 

या भागातून होणारे अमली पदार्थाचे व्यवहार बंद झाले नसल्याचे लोबो यांनी मान्य केले. हे व्यवहार बंद झाले नसले तरी त्यावर ब-याच प्रमाणात अंकुश लावण्यात यश लाभल्याची माहिती त्यांनी दिली. होणा-या या व्यवहारासंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून आढावा घेतला जात असल्याचे लोबो म्हणाले. एखाद्या ठिकाणी असे व्यवहार घडत असल्याचे निदर्शनाला आल्यास त्या संबंधीची योग्य माहिती आपल्याला पुरवण्याची सुचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्याचे ते म्हणाले. या व्यवसायावर नियंत्रण ठेवताना त्याच्या आहारी गेलेल्या तरूण पिढीचे योग्य प्रकारे पुर्नवसन होणे गरजेचे असल्याचे लोबो यांनी सांगितले. 

या कॅमेरांवरील नियंत्रण कक्ष उभारण्यात येणा-या खास माहिती घरात असेल. या माहिती घरातून मतदारसंघातील सर्व माहिती उपलब्ध उपलब्ध करुन लोकांना सेवा दिली जाईल. त्यामुळे कळंगुट भागात येणा-या लोकां बरोबर पर्यटकांची सुद्धा सोय होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. सीसीटीव्हीबरोबर होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राखील दलाचे पोलीस तैनात केले जाणार आहेत. कांदोळी तसेच अशा दोन ठिकाणी हे दल तैनात केले जाणार असून त्यांची सततची गस्त किनारी भागात सुरु राहणार आहे. 

गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना जाहीर करताना लोबो यांनी मात्र नाईट लाईफचे समर्थन केले आहे. प्रसिद्ध किनारी भागात नाईट लाईफ असणे अत्यावश्यक आहे. नाईट लाईफवर अनेक व्यवसायीक अवलंबून असून नाईट लाईफमुळेच बरेच पर्यटक आकर्षित होऊन येत असतात. तसेच पर्यटनाच्या वृद्धीसाठी सुद्धा ते आवश्यक आहे. विदेशातही ब-याच ठिकाणी बिनबोभाटपणे सुरू असल्याचे मत व्यक्त करुन या प्रकाराचे त्यांनी समर्थन केले. यावेळी लोबो यांनी स्वच्छतागृहासोबत पाण्याची तसेच पर्यटकांच्या गरजेच्या इतर व्यवस्था सुद्धा केल्या जातील अशी माहिती दिली.