शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अर्थसंकल्पाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत - मनोज काकुलो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 8:26 PM

उद्योगांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या डिजिटायझेशन योजनेचे स्वागत केले आहे

पणजी - उद्योगांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या डिजिटायझेशन योजनेचे स्वागत केले आहे.अध्यक्ष मनोज काकुलो यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या पहिल्याच अर्थसंकल्पात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ह्यसबका साथ, सबका विकासह्ण तसेच दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची समाजकल्याणासाठीची कटिबध्दताही दिसून येते.अर्थसंकल्पात उद्योगांसाठी प्रत्यक्ष काही दिलेले नसले तरी सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, वीज वितरण सुधारणा, अपारंपरिक ऊर्जा, आरोग्य तसेच उच्च शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे त्याचा लाभ उद्योगांना होईल. लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या कल्याणकारी योजना चालू ठेवण्याचा तसेच सर्व खात्यांचे डिजिटायझेशन, भू नोंदींचे डिजिटायझेशन करुन प्रत्येक तालुक्यात ते उपलब्ध करण्याचे पाऊल स्वागतार्ह आहे.२४ तास पिण्याची पाणी देण्याचा प्रयत्न, गोमेकॉत सुपरस्पेशालिटी सुविधा, नवी इस्पितळे, अंगणवाडींसाठी नव्या इमारती ही चांगली पावले आहेत. वीज वितरणात सुधारणा करण्याचा संकल्प व त्यादृष्टीने गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रे स्थापन करण्याचा निर्णय, तांत्रिकी उच्च शिक्षण अभ्यासक्रमात सुधारणा, कौशल्य विकास आदी पावले स्वागतार्ह आहेत.आर्थिक विकासाच्या माध्यमातून समाज कल्याणाप्रती कटिबध्दताही या अर्थसंकल्पातून दिसून येते, असे काकुलो यांनी शेवटी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाBudgetअर्थसंकल्प