शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

Goa Election 2022 : दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:16 PM

बाबू आजगावकर पुन्हा उपमुख्यमंत्री, दामू नाईक यांना मंत्रिपद देणार

मडगाव : काँग्रेसने रिजेक्टेड उमेदवार पुन्हा उभे केले आहेत. दोन-तीन चेहरे सोडले तर तेच चेहरे असून, फिक्सिंग करुन त्यांना तिकिटे दिली आहेत. दिगंबर कामत यांना हरविण्यासाठीच आम्ही बाबू आजगावकर यांना मडगावात उमेदवारी दिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  ते बोलत होते. सासष्टीत या खेपेला कमळ फुलेल, असे सांगून आगामी सरकार हे भाजपचे असेल. पूर्ण बहुमताचे सरकार स्थापनेसाठी मतदारांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, दामू नाईक, सावियो रॉड्रिगीस, उल्हास तुयेकर, दामोदर बांदोडकर, अँथनी बार्बोझ, दत्ता बोरकर हे सासष्टीतील मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व उर्फान मुल्ला हे पत्रकार परिषदेत हजर होते.

सासष्टीत भाजपला अनुकूल वातावरण आहे. बाबू आजगावकर हे आगामी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील, दामू नाईक हेही मंत्री असतील, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सालसेत मिशनची यावेळी गरज दिसली नाही. येथील मतदार भाजप समवेत आहेत. आमचे काही उमेदवार नवखे असले तरी ते विजयी होणार, त्याबाबत कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढचे सरकार हे भाजपचेच असून, प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. 

मडगावकरांना बदल हवा आहे, या मतदारसंघात विकास झालेला नाही. आपण पेडणे नंबर १ मतदारसंघ केला, मडगावही तसाच व्हायला पाहिजे, मडगावात आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ते म्हणाले. दामू नाईक यांनी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असे सांगितले. पूर्ण बहुमताचे सरकार असेल. राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भाजप ते देईल, असे सांगितले.

कब्रस्तान झोनबद्दल सरदेसाईंनी बोलावेदिगंबर कामत यांच्यावर शरसंधान साधताना कामत यांचे सरकार भ्रष्टाचारी होते. त्यांना आमच्या सरकारला भ्रष्टाचारी म्हणण्याचा अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. आमदार विजय सरदेसाई यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. कब्रस्तान जागेचा झोन कुणी बदलला, हे सरदेसाई यांनी लोकांना सांगावे व तेही मतदानापूर्वी सांगावे. सोनसोडोचे राजकारण कुणी केले, मडगावचा विकास कुणी मागे ठेवला, हे दिगंबर कामत यांनी सांगावे. कामत यांनी आपली कामे करुन घेतली. त्यांनी मडगावच्या विकासकामांसाठी पाठपुरावा केला का, ते विरोधी पक्षनेते होते.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा