शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

प्रमोद सावंत यांची लोकप्रियता वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:00 PM

प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीला आज १८ मार्च रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.

दत्ता खोलकर, म्हापसा 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज मुख्यमंत्रिपदाची चार वर्षे पूर्ण करत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गोवा भाजपा विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी सोपविली. गेली चार वर्षे डॉ. सावंत यांनी यशस्वीरित्या राज्याची धुरा सांभाळली. ते या काळात अनेक आव्हानांना समर्थपणे सामोरे गेले आहेत. २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनतेच्या भरघोस पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून दिली. राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून, गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते पूर्ण ताकदीने कार्यरत असल्याचे दिसते. 

गोव्यासारख्या छोट्या राज्यात येथील लोकसंख्या, अल्पसंख्यांकांची मोठी टक्केवारी, भौगोलिक रचना तसेच लहान मतदारसंघ व मतदारांची बहुपक्षीय निष्ठा, या सगळ्यांमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत वारंवार अस्पष्ट राजकीय कौल प्राप्त होत आला आहे. अशा वातावरणात चार वर्षे सलग राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविणे हे फार मोठे आव्हान पेलण्यासारखे आहे. डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचे शिवधनुष्य गेली चार वर्षे यशस्वीरित्या पेलले आहे.

मुक्त गोव्याने गेल्या ६१ वर्षांत तेरा मुख्यमंत्री अनुभवले. यापैकी डॉ. सावंत यांच्यासह फक्त सहाजणांनी चार वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण केला आहे. यात स्व. भाऊसाहेब बांदोडकर, स्व. शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंह राणे, स्व. मनोहर पर्रीकर व दिगंबर कामत यांचा समावेश आहे. राणे तर १९८० ते १९९० अशी सलग दहा वर्षे मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. १९९० ते २००० या दशकात राज्याने तेरा सरकारे आणि दोनदा राष्ट्रपती राजवट अनुभवली. त्यामुळे गोव्यात चार वर्षे सलगपणे मुख्यमंत्री म्हणून वावरणे म्हणजे नेत्याचे राजकीय कसब, मनमिळावू नेतृत्व गुण व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता सिद्ध करते.

डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च २०१९ रोजी, तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने राज्याची धुरा स्वीकारली. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती उद्भवली होती. भाजपाचे फक्त तेरा आमदार निवडून आले होते. मगोप व गोवा फॉरवर्ड तसेच अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने संयुक्त सरकार घडले होते. पर्रीकरांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याची पोकळी भरून काढणे: स नव्हते. गोव्याच्या राजकारणावर अस्थिरतेचे सावट दिसू लागले होते. १९९० च्या दशकातली राजकीय अस्थिरता परत डोके वर काढण्याची भीती जाणकार व्यक्त करत होते. पण डॉ. प्रमोद सावंत यांनी हळूहळू आपला जम बसवला. त्यांची कार्यपद्धती व राजकीय चातुराईमुळे, विरोधी पक्षाचा मोठा गट त्यांचे नेतृत्व मान्य करत सत्ताधारी पक्षात सामील झाला. त्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार बळकट झाले. भाजपा विधिमंडळ गटाची संख्या २७ झाली. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करून पुन्हा सत्ता मिळवली. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले व सध्या २८ आमदार असलेल्या विधिमंडळ गटाचे ते नेतृत्व करत आहेत. गोव्याच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्र्यांना एवढे भक्कम बहुमत कधीही मिळाले नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सगळ्यात मोठी उपलब्धी हीच आहे की, त्यांनी राज्याला गेली चार वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनखाली स्थिर व मजबूत सरकार दिले त्यामुळे राज्याची विकास यात्रा डब्बल इंजिनच्या वेगाने पुढे सरसावत आहे. सततचा प्रवास व लोकसंपर्क, हसतमुख चेहरा, मैत्रीपूर्ण संवाद, टीका व गाऱ्हाणी ऐकताना संयम बाळगणे तसेच स्वच्छ प्रतिमा, या सगळ्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख अनुभवायला मिळतो. विशेषतः तरुण वर्गात ते जास्त लोकप्रिय आहेत. समाजमाध्यमांवर त्यांची पकड मजबूत होताना दिसते. गोव्यातील राजकीय नेत्यांमध्ये सोशल मीडियाबाबतीत ते अव्वल स्थानावर आहेत. ते फक्त राज्यापुरते सीमित नसून, शेजारील राज्यातसुद्धा त्यांचे चाहते झपाट्याने वाढत आहेत. फेसबूकवर त्यांचे १८९ हजार चाहते असून द्विटरवर त्यांना १.३३ लाख लोक फॉलो करतात. त्यांच्या पोस्ट्सना हजारो लाइक्स मिळतात. लोकांबरोबर त्यांचा कनेक्ट मजबूत असून शेकडो लोक त्यांना नियमितपणे भेटत असतात.

सरकारचे नेतृत्व करताना, विधानसभेतील त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सभागृहाच्या कामकाजात ते विरोधी पक्षांना वरचढ ठरले आहेत. टीका झाली तरी त्यांनी विरोधकांना थंड करण्याचे कसब आत्मसात केले आहे. विरोधी आमदारांबरोबर त्यांनी सौहार्दाचे संबंध राखले आहेत. सरकारच्या निर्णयांचे योग्य पद्धतीने समर्थन करून आपली छाप पाडली आहे. आपल्या पार्टीतील कार्यकर्त्याबरोबर त्यांनी उत्तम समन्वय ठेवल्याने पक्षाचा कॅडर समाधानी आहे. तसेच पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाशीसुद्धा त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.

त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. मोपा विमानतळ, नवीन झुआरी पूल, अत्याधुनिक जोड महामार्ग, आयुष इस्पितळ, जीएमसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास नेले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे त्यांचे ब्रीदवाक्य असून गोवा सरकारी कर्मचारी भरती आयोग स्थापन करून त्यांनी जनतेची वाहव्वा मिळवली. गेली कित्येक वर्षे बंद पडलेले खाणकाम सुरू करण्यासाठी खाण लिलाव पुकारून आपल्याला राज्याचे हित सांभाळायचे असल्याचे सिद्ध केले. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत हजारो करोड़ जमा होणार आहेत. त्यांच्या स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भरभरून प्रशंसा केली आहे.

'स्वयंपूर्ण गोवा' व 'सरकार तुमच्या दारी' यांसारख्या अभिनव योजना राबवून डॉ. सावंत यांनी आपली लोकांप्रती तळमळ व्यक्त केली आहे. समाजातील सगळ्यात कमकुवत घटकांना आपल्या सरकारचा लाभ मिळावा व राज्याच्या विकासयात्रेत ते सामील व्हावेत, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन त्यांनी हे कार्यक्रम राबविले. दिव्यांग बांधवांसाठी पर्पल फेस्त हा मोठा इव्हेंट घडवून आणला, ज्याचे पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमात कौतुक केले. नार्वे येथील ऐतिहासिक सप्तकोटेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण पूर्ण करून त्याला गतवैभव प्राप्त करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे देशभरात कौतुक झाले. खुद्द पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. गोमंतकातील प्राचीन मंदिरे तसेच किल्ले यांची गोवा सरकारतर्फे पुनर्बांधणी केली जाईल, हे जाहीर करून त्यांनी गोव्याचा इतिहास व सांस्कृतिक वारसा याबद्दल आपला ज्वलंत स्वाभिमान व्यक्त करून गोमंतकीयांची मने जिंकली. एकूणच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मोदींच्या प्रेरणेने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या मंत्रानुसार राज्य पुढे नेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी वावरत आहेत. त्यांनी येणाऱ्या काळात अशाचप्रकारे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटावे व राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळावी, ही अपेक्षा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत