प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:25 PM2019-03-20T13:25:15+5:302019-03-20T13:27:57+5:30
विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांचं मतदान
Next
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सावंत यांच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्र गोमांतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी साथ दिल्यानं सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
Goa Chief Minister Pramod Sawant wins floor test after 20 MLAs voted in his favor in the state assembly. pic.twitter.com/kBbxcAvwGU
— ANI (@ANI) March 20, 2019
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानं भाजपानंप्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. हे पद कायम राखण्यासाठी सावंत यांना विश्वासदर्शक ठराव जिंकणं गरजेचं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केल्यानं सावंत यांचं मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे. भाजपाच्या 11, महाराष्ट्र गोमांतकच्या 3, गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांसह 3 अपक्षांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर काँग्रेसच्या 14, एनसीपी (चर्चिल) एका आमदारानं ठरावाच्या विरोधात मतदान केलं.