शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

'ऑपरेशन कमळ फेल'! महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही पक्ष फोडण्याचा होता भाजपचा डाव, काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:34 AM

"भाजपचे ऑपरेशन कमळ अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही."

गोवाकाँग्रेसवर आलेले संकट अद्याप  संपलेले नाही. मात्र, यातच, 'फ्लॉप ऑपरेशन कमाळ', असे म्हणत पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला आहे. याशिवाय, त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावरही मोठे आरोप केले. पक्षाचे काही मुख्य नेते रविवारी संपर्काबाहेर गेले होते. यामुळे ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

न्यूज18 सोबत बोलताना राव म्हणाले, 'आमच्याशी एकनिष्ठ असलेले कोण आणि पक्षांतर करणारे कोण? हे आम्हाला माहीत आहे. भाजपने आणखी एक प्रयत्न केला, पण तो सपशेल अयशस्वी ठरला. दबाव असूनही आमचे तरुण आणि प्रथमच निवडून आलेले आमदार सोबत आहेत. गेल्या महिनाभरापासून हे कारस्थान सुरू होते.'

राव यांनी आरोप केला, की आमदारांवर खदान, कोळसा आणि उद्योगांसह अनेक ठिकाणांवरून दबाव टाकण्यात आला. एवढेच नाही, काँग्रेसकडे 7 आमदार आहेत, अशी पुष्टीही राव यांनी केली आहे. याच बरोबर चार नेते पक्षासोबत नाहीत, असेही राव यांनी म्हटले आहे. यांत मायकल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक आणि डेलिलाया लोबो यांचा समावेश आहे. तसेच, 'मंत्र्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप किती खआलच्या पातळीवर उतरली आहे, हे लज्जास्पद आहे,' असेही राव यांनी म्हटले आहे. राव म्हणाले, "भाजपचे ऑपरेशन कमळ अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. खरे तर, भाजपने महाराष्ट्राप्रमाणेच पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फोडून आपली संख्या 25 वरून 33 वर नेण्याची योजना आखली होती. असे झाले असते, तर भाजपची संख्या 40 पैकी 33 एवढी झाली असती आणि ते विरोधी पक्ष मुक्त झाले असते." एवढेच नाही, तर काँग्रेस आमदारांशी संपर्क साधणारे भाजप नेते त्यांच्यासोबत केवळ पैशांसंदर्भातच बोलले नाही, तर त्यांना ईडी आणि आयकरच्या रेडची धमकीही दिली, असा आरोपही राव यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण