गोव्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय आणि प्रभागस्तरीय समित्या येत्या २0 पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:36 PM2019-01-15T21:36:11+5:302019-01-15T21:36:22+5:30
प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या २0 पर्यंत बुथस्तरीय आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पणजी - प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या २0 पर्यंत बुथस्तरीय आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हेही बैठकीस उपस्थित होते.
आर्चबिशप फिलिप फेरी फेर्रांव यांची कॉन्फरन्स आॅफ कॅथॉलिक बिशप्स आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठराव घेण्यात आला.
२0 जानेवारीपर्यंत बूथ आणि प्रभागस्तरीय समित्या स्थापन करुन मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे ठरले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे महिनाअखेर गोवा दौºयावर येण्याची शक्यता आहे. पक्षाचे बूथ अध्यक्ष तसेच प्रभाग अध्यक्षांना ते संबोधित करतील. पक्षाचे सध्या जनसंपर्क अभियान चालू असून घरोघरी भेट देऊन भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणारी पत्रके लोकांना वाटली जात आहेत. या उपक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. येणाºया काळात शक्ती कार्यक्रम नेटाने राबविण्याचे ठरले त्यासाठी पदाधिकाºयांना जबाबदाºयाही वाटून देण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी दिली.