शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

गोवा कॉंग्रेस अध्यक्षांची आरजी प्रमुखाविरुद्ध बदनामीची तक्रार

By वासुदेव.पागी | Published: November 09, 2023 4:29 PM

पाटकर यांनी पणजी पोलीस स्थानकात मनोज परब यांच्या विरोधात  नोंद केलेल्या तक्रारीत परब यांनी आपली जाहीरपणे बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

पणजी: खाण घोटाळा प्रकरणावरील आरोपांची दखल घेऊन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रिवोल्युशनरी गोवन्सचे प्रमुख  मनोज परब यांच्या विरुद्ध बदनामीची तक्रार पणजी पोलीस स्थानकात नोंदविली आहे. 

पाटकर यांनी पणजी पोलीस स्थानकात मनोज परब यांच्या विरोधात  नोंद केलेल्या तक्रारीत परब यांनी आपली जाहीरपणे बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी पणजी पोलिसांना केली आहे. 

बुधवारी परब यांनी पाटकर यांच्या विरुद्ध गंभीर आरोप करताना ते खाण घोटाळ्यात गुंतल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना खाण लिजांच्या इ ऑक्शनमध्ये सहभाी होण्यासाठी सवलतही मिळाली होती असा आरोपही त्यांनी केला आहे. 

दरम्यान खाणींच्या मुद्यावरून पाटकर व  परब यांच्यामध्ये एकमेकांवर जोरदार आणि गंभीर स्वरुपाचे आरोप होताना दिसत आहेत. गुरूवारी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटकर  यांनी रिवोल्युशनरी गोवन्सचे नेतृत्व बेताल व बेजबाबदार वक्तव्ये करीत असल्याची टीका केली. त्यांचा तुकाराम परब असा उल्लेख करताना ते म्हणाला की परब यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाईसाठी परब याला सामोरे जावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस