मडगाव - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत हे खोटारडे असल्याची जाहीर कबुली दिल्याने गोमंतकीयानी कोविड संकटकाळात आपले प्रश्न व समस्या घेऊन कुणाकडे जावे याचे स्पष्टीकरण देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी याना सांगावे अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
गोव्याच्या प्रशासनावरचा ताबा गेलेल्या तसेच कोविड हाताळणीत पूर्णपणे अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी आता राज्याच्या घटना प्रमुखांचा विश्वासही घालवला आहे. आता त्यांचे सगळे डिफेक्टस उघड्यावर दिसत आहेत.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मे महिन्यात काॅंग्रेस पक्षाने दाखवून दिलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करुन "जजमेंटल ॲरर" करीत मुख्यमंत्र्यांची अकारण पाठराखण केली होती. सरकार अपयशी ठरल्याचे सांगुन , राज्यपालानी प्रशासन आपल्या हातात घ्यावे अशी मागणी आम्ही त्यावेळीच केली होती. सरकारला आम्ही "डिफेक्टीव्ह" म्हटल्यानंतर, राजभवनातून प्रसिद्धी पत्रक देवुन राज्यपालानी मुख्यमंत्र्याना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला व एका अर्थी त्यांच्या चुकांवर पांघरुण घातले. त्याचा गंभिर परिणाम आज लोकाना भोगावा लागत आहे.
वास्को लाॅकडाऊन न करण्यात सरकारची चुक झाली हे मान्य करुन राज्यपालांनी कोविडमुळे ज्या २० जणांचे प्राण गेले त्यासाठी गोव्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचे एका अर्थी मान्य केले आहे. राज्यपालानी त्यापुढे जाऊन, सरकारने कोविडसह इतर रोगांची लागण झालेल्या रुग्णाना सरकारकडुन योग्य उपचार मिळत नसल्याचेही उघड केले आहे.
सरकारने माजी मंत्री डाॅ. सुरेश आमोणकर तसेच काॅंग्रेसचे नेते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या मृत्युंची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीचा आम्ही पुर्नउच्चार करतो. कोविड इस्पितळात मुरगावचे नगरसेवक पास्कोल डिसोजा तसेच इतर रुग्णांना मिळालेला अयोग्य उपचार व सुविधा याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कोविड हाताळणीतील भूमिकेची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यानी गोवा कोरोना मुक्त झाल्याचे व ग्रीन झोन जाहीर करण्याची कृती घातक होती हे राज्यपालाना आता कळले हे दुर्देवी आहे. सदर निर्णयानेच गोवा आज कोविड डेस्टीनेशन म्हणुन पुढे आला आहे.
राज्यपालानी सरकारला कोविड हाताळणी सबंधी कृती आराखडा तसेच श्वेतपत्र त्वरित जाहिर करण्यास सांगावे नपेक्षा काॅंग्रेस पक्षाला उग्र आंदोलन करणे भाग पडेल असा इशारा गिरीश चोडणकर यानी दिला आहे.