शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Goa: ‘हरी... जय जय राम कृष्णा हरी’ च्या नाम गजरात देव दामोदराच्या १२४ व्या भजनी सप्ताहाची सुरवात

By पंकज शेट्ये | Updated: August 22, 2023 18:08 IST

Goa: वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी मंगळवारी (दि.२२) दुपारी १२.३० वाजता उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते श्रीफळ ठेवल्यानंतर १२४ व्या अखंड २४ तासाच्या श्री देव दामोदर भजनी सप्ताहाची सुरवात झाली.

- पंकज शेट्ये वास्को - वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी मंगळवारी (दि.२२) दुपारी १२.३० वाजता उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते श्रीफळ ठेवल्यानंतर १२४ व्या अखंड २४ तासाच्या श्री देव दामोदर भजनी सप्ताहाची सुरवात झाली. बुधवारी (दि.२३) दुपारी खारीवाडा, वास्को येथील समुद्रात गेल्या वर्षाचा देवा चरणी ठेवलेल्या श्रीफळाचे विर्सजन केल्यानंतर १२४ व्या दामोदर भजनी सप्ताहाची सांगता होईल. मंगळवारी पहाटे पासूनच भाविकांनी सप्ताहा निमित्ताने देव दामोदराच्या मंदिरात जाऊन ‘श्रीं’ चा आर्शिवाद घेण्यास सुरवात केली होती.

वास्कोवासियांचा ग्राम दैवत देव दामोदराच्या १२४ व्या अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाची सुरवात मंगळवारी होत असल्याने पहाटे पासूनच भक्तांनी देव दामोदराचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेण्यासाठी मंदिराबाहेर गर्दि करायला सुरवात केल्याचे दिसून आले. दुपारी १२.३० वाजता सप्ताहाची सुरवात होत असल्याने मंदिरात शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली. वास्कोतील उद्योजक प्रशांत वसंतराव जोशी यांनी १२.३० वाजता देवा चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर भजनी गायक अशोक मनोहर मांर्देकर यांनी ‘हरी जय जय राम कृष्णा हरी’ चे नाम उच्चारल्यानंतर अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाची सुरवात झाली. १२४ व्या भजनी सप्ताहाची मंगळवारी दुपारी सुरवात झाली असता येथे दामोदर भजनी सप्ताहा समितीचे अध्यक्ष विष्णू गारुडी आणि इतर पदाधिकाºयांनी उपस्थिती लावून त्यांनी देवाचा अर्शिवाद घेतला. सप्ताहाची सुरवात होण्यावेळी मंदिराचे मुख्य पुरोहीत भूषण रमेश जोशी यांनी देवासमोर सामुहीक गाºहाणे घालून भक्तगणांकडून करण्यात येणारी सेवा मान्य करावी अशी प्रार्थना केली.

भजनी सप्ताहाच्या निमित्ताने पारंपारीकरित्या विविध समाजाचे येणारे दिंडी पार संध्याकाळी सहा वाजल्यापासून मंदिराशी जाण्यास सुरू होणार असून फैलवाले समाजाचा पार रात्री मंदिराकडे पोचल्यानंतर नाभीक समाज, दैवज्ञ ब्राम्हण समाज, विश्वकर्मा ब्राम्हण समाज, बाजारकर समिती व नंतर पहाटे साडेसहाच्या सुमारास गाडेकर समाजाचा पार पोचणार आहे. सप्ताह दिवशी संध्याकाळपर्यंत पावसाचे आगमन झाले नसल्याने भविकांनी मंदिराबाहेर मोठ्या रांगेत गर्दी करून ते देवाचा आर्शिवाद घेताना दिसून आले. सप्ताहाच्या निमित्ताने वास्को शहरात थाटलेल्या फेरीतही गच्च अशी गर्दि पडल्याचे दिसून आले असून सप्ताहा काळात येथे कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी कडक पोलीस बंदोबस्त सर्व हालचालीवर नजर ठेवताना दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराबाहेरील आवारात आणि स्वातंत्रपथ मार्गावर थाटलेल्या फेरीच्या विविध ठिकाणी १५ सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलीसांकडून सर्व हालचालींवर कडक नजर ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले. सप्ताहाच्या निमित्ताने वास्कोबरोबरच गोवा आणि जवळच्या राज्यातील हजारो भक्तांनी मंगळवारी देव दामोदराच्या मंदिरात उपस्थिती लावून ‘श्रीं’ चा अर्शिवाद घेतला.

मंदीरात चालणाºया २४ तासाच्या भजनात वास्को शहरातील विविध भजनी पथकांनी त्यांना दिलेल्या वेळेत भजन सादर करणार. परंपरेनुसार वास्को शहरातील वेगवेगळ््या भागात उभारलेल्या व्यसपिठावर संध्याकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत गायनाच्या मैफल सादर होणार असून त्याचा आनंदही शेकडो भाविक घेणार. देव दामोदर वास्कोचे ग्राम दैवत असून हजारो हिंदु बांधवाबरोबरच इतर धर्माच्या अनेक बांधवांनी मंदिरात उपस्थिती लावून देवाचा अर्शिवाद घेतल्याचे दुपारी दिसून आले. सप्ताहाच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी, राजकीय व्यक्तींनी सर्वसाधारण लोकासारखेच देवाचे दर्शन घेऊन अर्शिवाद घेतले. दुपारी सप्ताहाची सुरवात होण्यावेळी असंख्य भाविकात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर, माजीमंत्री मिलींद नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, गोव्याचे नामावंत उद्योगपती नारायण (नाना) बांदेकर, गोव्याचे माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फीलीप डीसोझा इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावून देवाचा आर्शिवाद घेतला. बुधवारी दुपारी १२४ व्या भजनी सप्ताहाची सांगता होणार असली तरी येथे थाटलेली फेरी सात दिवसासाठी चालणार असून ह्या काळातही मोठ्या प्रमाणात भक्तगण मंदिरात देवाचा आर्शिवाद घेण्यासाठी आणि फेरीत फीरण्यासाठी येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतला देव दामोदराचा अर्शिवादवास्कोतील देव दामोदराच्या अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहानिमित्ताने मंगळवारी (दि.२२) दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासहीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर मान्यवरांनी मंगळवारी दुपारी देव दामोदराच्या मंदिरात उपस्थिती लावून ‘श्रीं’ चा आर्शिवाद घेतला.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत