- पंकज शेट्ये वास्को - बारमध्ये बसून मद्यसेवन करताना चार तरुणांच्या गटाचे अन्य एका तरुणाशी किरकोळ विषयावरून वाद घातल्यानंतर त्याचे परीवर्तन मारामारीत झाले. बिर्ला - झुआरीनगर येथील बारमध्ये मंगळवारी रात्री ११.३० वाजता चार तरुणांनी मंजूनाथ नौले नामक २१ वर्षीय तरुणावर चाकू आणि काचेच्या ग्लासने हल्ला करून मारहाण केल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहे. त्याप्रकरणात वेर्णा पोलीसांनी त्वरित कारवाई करून रात्रीच चार जणाच्या गटातील रंगप्पा कमल याला अटक केली. पोलीसांनी अटक केलेला रंगप्पा साकवाळ पंचायतीचा माजी पंच सदस्य असून बुधवारी (दि.२९) त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्यास दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजाविला.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजता मारहाणीचा ती घटना घडला. बिर्ला - झुआरीनगर येथे असलेल्या ‘प्रिती बार ॲण्ड रेस्ट्रोरंण्ट’ मध्ये चार तरुणांचा एक गट मद्यसेवनासाठी बसला होता. तसेच तेथे असलेल्या दुसऱ्या टेबलवर बिर्ला - झुआरीनगर येथे राहणारा मंजूनाथ नौले नामक तरुण बसला होता. ‘तु कोणाला पाहतोस’ अशा किरकोळ विषयावरून चार तरुणाचा आणि मंजूनाथचा वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे परिर्वतन मारामारीत झाले. त्या चार तरुणांनी मंजूनाथची मारहाण करण्यास सुरू करून त्याच्या डोक्यावर काचेच्या ग्लासने हल्ला करण्याबरोबरच पाठीवर सुऱ्याने हल्ला केल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. मंजूनाथची मारहाण केल्यानंतर चारही तरुणांनी घटनास्थळावरून पोबारा काढल्याची माहीती पोलीसांनी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या मंजूनाथला नंतर त्वरित बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेला मंजूनाथ कबड्डी खेळाडू असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.
वेर्णा पोलीसांना मंजूनाथ नौलेच्या मारहाणीची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशीला सुरवात केली. मंजूनाथच्या मारहाण प्रकरणात साकवाळचे माजी पंच रंगप्पा कमल यांच्यासहीत शिवानंद हीरेगौडार, युवराज चिंबल आणि दिपक हिरेमठी असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्वरित कारवाई करून रंगप्पा याला ताब्यात घेऊन अटक केली. त्या मारहाण प्रकरणातील इतर तीन संशयित आरोपी सापडलेले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी वेर्णा पोलीसांनी रंगप्पा याला न्यायालयात उपस्थित केला असता त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधिक्षाने बजाविला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.