लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : वीज मंत्री नीलेश काब्राल यांच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ झाल्याने गोव्याला मोफत वीज का मिळत नाही हे स्पष्ट होते, असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालेकर यांनी नमूद केले की काब्रालच्या २०१५-२०१६ च्या संपत्ती एकूण उत्पन्न रु. ९,५०,४७४ , तर त्याच्या २०१९-२०२० मध्ये त्याचे एकूण उत्पन्न रु. ३,१९,७२,६३२ आहे. हे ३००० टक्के वाढ दर्शवते. पालेकर म्हणाले की, काब्राल यांना ‘२५ दिन में पैसा डबल योजना’ माहीत आहे असा टोमणा त्यांनी मारला.
पालेकर म्हणाले की, बहुतेकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोफत वीज देण्याच्या आश्वासनावर टीका केली. मात्र, भ्रष्टाचार संपवला तर गोव्याला मोफत वीज देणे शक्य आहे, असे ‘आप’कडून वारंवार सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा राजकारण्यांच्या खिशात जात आहे. पाच वर्षांत काब्रालचे उत्पन्न तिपटीने वाढले यावरून भाजपचे मंत्री भ्रष्टाचारात किती गुंतले आहेत हे दिसून येते.
पालेकर यांनी गोवेकरांना काब्राल यांच्यापर्यंत पैसे घेऊन जाण्याचे आवाहन केले. काब्रालला “२५ दिन में पैसा डबल योजना” माहीत असल्याने ते पैसे दुप्पट करतील. “गोव्याचे बजेट २१,०५६.३५ कोटी रुपये आहे आणि प्रत्येक गोमंतकीवर १,४०.००० रुपये खर्च करण्यात येते . काब्रालच्या संपत्तीत झालेली वाढ पाहिल्यानंतर तो पैसा कुठे गेला हे लक्षात येईल. अशा गब्बरांना बाहेर काढण्याची गरज आहे. काब्राल हेराफेरी भाग ३ साठी तयारी करत आहेत. आता कुडचडेच्या लोकांनी मतदारसंघाच्या भल्यासाठी ‘आप’ला मत देण्याची ही संधी घेणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.
आप कुडचडेचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस म्हणाले की, काब्राल यांनी २०१२ मध्ये खाण बायपासचे आश्वासन दिले होते, परंतु प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. बसस्थानक प्रकल्प, क्रीडा संकुल किंवा रवींद्र भवन अद्याप पूर्ण केलेले नाही.