Goa Election 2022: निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:50 PM2022-03-08T14:50:58+5:302022-03-08T14:52:09+5:30

Goa Election 2022: निकालापूर्वी गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांच्या बैठका वाढल्या असल्याचे सांगितले जात आहे.

goa election 2022 ahead of results congress scared of burglary in goa shifting leaders in kolhapur and rajasthan | Goa Election 2022: निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार!

Goa Election 2022: निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार!

Next

पणजी: उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पाचही निवडणुकांची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर असून, निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांना महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये हलवले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये धाकधुकीचे वातावरण आहे. अशातच काँग्रेसने आपल्या उमेदवारांना इतर ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस उमेदवारांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोल्हापूर किंवा राजस्थानमध्ये हलवले जाऊ शकते

मिळालेल्या माहितीनुसार, काही पक्ष आपल्या नेत्यांना फोडून त्यांच्या पक्षात सामील करणार असल्याची भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना कोल्हापूर किंवा राजस्थानमध्ये हलवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सर्वांत मोठा पक्ष होऊनही काँग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करता आले नाही. याच अनुभवानंतर आता यावेळी काँग्रेस प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत आहे. अनेकविध एक्झिट पोलमध्ये गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी प्रमोद सावंत यांनी गोव्यातील परिस्थितीबाबत माहिती देत अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्याचे बोलले जात आहे. तसेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तरी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सोबत घेऊन पुढे जाऊ, असे काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी म्हटले आहे. निकालापूर्वी गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांच्या बैठका वाढल्या आहेत. 
 

Web Title: goa election 2022 ahead of results congress scared of burglary in goa shifting leaders in kolhapur and rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.