शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Goa Election 2022: पणजीत बाबुश विरुद्ध उत्पल यांच्यात चुरस; मतदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 3:09 PM

Goa Election 2022: दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रमुख कार्यकर्ते उत्पल यांच्या पाठीशी असून, बाबूशविरुद्ध काँटे की टक्कर पणजीत पाहायला मिळत आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : तिसवाडी तालुक्यातील पाचही मतदारसंघांमध्ये यावेळी बदलाचे वारे आहे. पणजी मतदारसंघात बाबूश मोन्सेरात त्यांच्यासमोर अपक्ष उत्पल पर्रीकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. तर ताळगावात भाजपच्या जेनिफर मोन्सेरात यांना काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्स यांनी घाम काढला आहे. आजवर नेहमी प्रस्थापितांच्या हातात राहिलेल्या या तालुक्यातील किमान चार मतदारसंघांमध्ये यावेळी प्रस्थापितांना धक्का बसेल, असे निकाल लागू शकतात.

सांताक्रुझमध्ये टोनी फर्नांडिस अडचणीत आहेत तर कुंभारजुवेत जेनिता मडकईकर यांना काँग्रेसचे राजेश फळदेसाई व तृणमूलचे समिल वळवईकर यांच्याकडून जबरदस्त आव्हान आहे. तेथे भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार रोहन हरमलकर हे भाजपची मते फोडतील. सांताक्रुझध्ये टोनी फर्नांडिस यांना काँग्रेसचे उमेदवार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ॲड. अमित पालेकर हे या मतदारसंघातून शर्यतीत असून प्रचाराबाबतीत त्यांनी बरीच आघाडी घेतलेली आहे.

सांत आंद्रेत आम आदमी पक्षाचे रामराव वाघ यांनी विद्यमान आमदार भाजपचे फ्रांसिस सिल्वेरा यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. गोवा फॉरवर्डचे जगदिश भोबे हेही येथे शर्यतीत आहेत. कुंभारजुवेंत यावेळी भाजपने आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांचा प्रभाव तुलनेत कमी दिसून येत आहे. रोहन हरमलकर हे भाजप बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत तसेच जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांनी कुंभारजुवेंवर फारसे लक्ष न देता पक्षाने वास्को मतदारसंघाची सोपवलेली जबाबदारी हाताळण्यावर भर दिल्याने जेनिता यांना एक हाती सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे राजेश फळदेसाई आणि तृणमूलचे समील वळवईकर यांच्या या मतदारसंघात तुल्यबळ लढत होईल.

पणजीत उत्पल यांना अखेरच्या टप्प्यातही वाढता पाठिंबा दिसून आला. काँग्रेसचे बंडखोर माजी महापौर व नगरसेवक उदय मडकईकर हे त्यांच्यासाठी सक्रियपणे वावरत आहेत. शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी अर्ज मागे घेऊन उत्पल यांना पाठिंबा दिला आहे. तसेच दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे प्रमुख कार्यकर्ते उत्पल यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे बाबूश विरुद्ध उत्पल अशी काँटे की टक्कर या मतदारसंघात आहे.

ताळगांवमध्ये काही युवा मतदार आपच्या उमेदवार सिसिल रॉड्रिग्स यांच्या पाठीशी असल्याचे या भागात कानोसा घेतला असता दिसून आले. भाजप बंडखोर दत्तप्रसाद नाईक यांनी आपली सर्व ताकद टोनी यांच्या मागे उभी केली आहे. भाजपच राजीनामा दिल्यानंतर दत्तप्रसाद हे सक्रियपणे टोनी यांच्या प्रचारात उतरले आहेत. दत्तप्रसाद यांनी ताळगावमधून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडणूक लढविली आहे. आणि त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहेत, त्याचा फायदा टोनी यांना होईल. शिवाय काँग्रेस बंडखोर उदय मडकईकर तसेच माजी नगरसेवक दया कारापूरकर यांनीही टोनी यांच्यासाठी ताळगावमध्ये सर्व शक्ती पणाला लावली आहे.

सांत आंद्रेमध्ये चार वेळा निवडून आलेले फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यासमोरही आम आदमी पक्षाचे उमेदवार रामराव वाघ यांच्याकडून आव्हान आहे. या मतदारसंघात आजोशी, मंडूर, गोवा वेल्हा भागात फेरफटका मारला असता सिल्वेरांचे पक्षांतर तसेच नावशी मरिना प्रकल्प व इतर मुद्यांवर असलेली नाराजी दिसून आली. येथे प्रस्थापितांविरुद्धच्या लाटेत लोकांना यावेळी बदल हवा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नोकऱ्यांच्या बाबतीतही भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गुणवत्ता असूनही अपात्र ठरविले जाते आणि पैसे चारले तर नोकऱ्या दिल्या जातात. गेल्या पाच वर्षात जे घडले ते पुरे, यापुढे त्याची पुनरावृत्ती आम्हाला नको अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळाल्या. आजोशी, मंडूर, डोंगरी हा भाग भाजपचे वर्चस्व असलेला आहे येथे रामराव वाघ यांची आघाडी दिसून येते तर गोवा वेल्हा, आगशी भागात ख्रिस्ती मतदारांमध्ये काँग्रेसचे उमेदवार ॲंथनी फर्नांडिस यांचे वर्चस्व दिसून येते. सिल्वेरा यांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत.

ताळगांवमध्ये सां-पॉल बाजारपेठेत या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता जेनिफर यांच्याबद्दल नाराजी दिसून आली. पाच वर्षात त्या फिरकल्या नाहीत, अशी तक्रार काहीजणांनी केली. जेनिफर यांचा करिष्मा फक्त पती बाबूश यांच्यावरच अवलंबून आहे. बाबूश यांना यावेळी पणजीत उत्पल यांनी जबरदस्त आव्हान निर्माण केल्याने ते स्वत: तेथे व्यस्त राहिले व ताळगाव मतदारसंघात फिरु शकले नाहीत. उदय मडकईकर, दया करापूरकर आदी पूर्वीचे निकटवर्तीय आता बाबूशबरोबर नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैशांचा अनिर्बंध वापर, गुळगुळीत रस्त्यांसारखी नजरेत भरणारी विकासकामे आणि गरीब मतदारांना अंकीत ठेवणारे प्रलोभनांचे गाजर या बळावर ताळगाव मतदारसंघ आतापर्यंत काबीज केला जात होता. यावेळी मात्र ताळगावमध्ये परिवर्तनाचे जोरदार वारे आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपाPoliticsराजकारण