लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : साखळी मतदारसंघात तसेच राज्यात विकासाच्या अनेक योजना पूर्ण केल्या आहेत. आगामी पाच वर्षात राज्यात समृद्धीसाठी नव्या योजनांची तयारी केली आहे. साखळी शहरात अनेक लोक भाजप प्रवेश करीत असल्याने या वेळेला मतदारसंघात भाजपला विक्रमी मतदान होणार असल्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. राहुल गांधी साखळीत आले म्हणून त्याचा एक टक्काही परिणाम भाजपवर होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
राहुल गांधी येऊन काँग्रेसला मते मिळणार नाहीत.भाजपवर कोणताही परिणाम नसून जनतेने डबल इंजिन सरकारची निवड केलेली आहे. ती १४ रोजी परिपूर्ण होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. देसाईनगर येथून रोड शोला सुरुवात झाली. संपूर्ण कॉलनी तसेच बाजारात फिरून पत्रके वितरण करण्यात आली. यावेळी सिद्धिविनायक देवस्थानच्या संपूर्ण समितीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे डॉ. सावंत यांनी स्वागत केले. यावेळी भाजपच्या उपाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी गोवा आदर्श राज्य असून, डॉ. सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रशासन दिले.
यावेळी शुभदा सावईकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मा देसाई, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, रश्मी देसाई, दयानंद बोर्येकर, यशवंत देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.