गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. परंतु भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. गोव्यामध्ये भाजप आणि उत्पल पर्रीकर यांचा मुद्दा फार गाजत आहे. दरम्यान, भाजप उत्पल पर्रीकर यांना संधी देणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. भाजपनं गुरूवारी आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांची ४० पैकी ३४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपनं माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना मात्र पणजीतून उमेदवारी नाकारली आहे.