लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : साखळी मतदार संघातून मुख्यमंत्री तथा साखळीचे भाजप उमेदवार प्रमोद सावंत शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. साखळी मंडळ समितीचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस कालिदास गावस यांनी ही माहिती दिली.
‘डबल इंजिन सरकार प्रत्येक घरात समृद्धीसाठी विशेष प्रयत्नरत आहे’ असे सावंत म्हणाले. ‘परराज्यातून पर्यटक पक्ष आले आहेत. त्यांच्या थापा, खोट्या योजना, फसवी आश्वासनांना मतकीय जनता बळी पडणार नाही’, अशी टीका यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांवर केली.