Goa Election 2022: काँग्रेसकडून ११ उमेदवार घोषित; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानींना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:32 AM2022-01-19T09:32:33+5:302022-01-19T09:33:03+5:30
Goa Election 2022: उमेदवारी देण्याच्या बाबतीत तरी काँग्रेसने भाजपला मागे टाकत आणखी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : उमेदवारी देण्याच्या बाबतीत तरी काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. काँग्रेसने आणखी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नुवेंत माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा तर मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्या विरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँन्थनी फर्नांडिस, वेळीत सावियो डिसिल्वा तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ९ उमेदवारांत पाच चेहरे नवीन आहेत. मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्याविरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँथनी फर्नांडिस तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काणकोणात तिरकी चाल
काणकोण मतदरसंघात उमेदवारीच्या शर्यतीत होते ते महादेव देसाई आणि चेतन देसाई; परंतु यांच्यापैकी कुणा एकाला उमेदवारी दिल्यास बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिसत होते. त्यामुळे एक अनपेक्षित निर्णय घेताना जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारी हे काँग्रेसचे निष्ठावान नेते असून उमेदवारीसाठी त्यांनी कधीच दावा केला नव्हता.