लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांंचा आम्ही आदर करतो. त्यांचे व काँग्रेसचे नाते जुने आहे. त्यामुळे गोव्यात तृणमूल काँग्रेसचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होतोय का याचा त्यांंनी विचार करावा. अजुनही वेळ गेली नसून भाजपविरोधात लढा उभारण्यासाठी तृणमूलने काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांंनी पत्रकार परिषदेत केले.
केंद्र असो किंंवा विविध राज्यांंतील भाजप सरकार असो. युवकांंना रोजगार देण्यात तसेच महिला सुरक्षा या दोन्ही विषयांंवर त्यांंना सपशेल अपयश आले आहे. महिला सुरक्षा तसेच रोजगाराशिवाय अच्छे दिन तरी कसे येतील. गोव्यात मात्र नोकऱ्यांंच्या नावे घोटाळे होत आहे. विविध सरकारी खात्यांंमधील नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप थेट सत्ताधारी पक्षाचेच आमदार करीत आहेत. मात्र, या सर्वात युवकांंवर मात्र अन्याय होत असल्याचा आरोप त्यांंनी केला.
भाजप सरकारला केवळ रोजगारदृष्ट्याच नव्हे तर महिला सुरक्षा या विषयावरसुद्धा अपयश आले आहे. देशभरात मागील वर्षी महिला अत्याचाराची ३.७१ लाख प्रकरणांंची नोंद झाली. महिलांंवर अत्याचार होत असतानाच दुसरीकडे मात्र गुन्हेगार मुक्तपण फिरत आहेत. तर सरकार जाहिरबाजीत व्यस्त असल्याचा आराेप सुरजेवाला यांंनी केला. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंंडू राव, अलका लांंबा व अन्य नेते हजर होते.
नवी राजकीय संस्कृती
पक्षांंतर न करण्याची काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांंकडून जी प्रतिज्ञा घेतली आहे, त्यामुळे नव्या राजकीय संस्कृतीला सुरुवात होणार आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे उमेदवार आपल्या मतदारांंना बाधील राहतील व पक्षांंतर करणार नाहीत, असे रणदीप सुरजेवाला यांंनी स्पष्ट केले.
बेरोजगारीत गोवा दुसऱ्या स्थानी
गोव्यासह देशभरातील विविध सरकारी खात्यांंमध्ये ६० लाख नोकऱ्यांंची पदे रिक्त आहेत. यापैकी ३० लाख रिक्त पदे ही केवळ केंद्र सरकार तसेच त्यांच्याशी संंलग्न असलेल्या वेगवेगळ्या खात्यांंमध्ये आहेत. मात्र, सरकारने ही रिक्त पदे न भरून युवकांंवर अन्याय केला. देशात बेरोजगारीची टक्केवारी ७.९ टक्के असून गोवा बेराेजगारीत देशात दुसऱ्या स्थानावर असल्याचा आराेप त्यांंनी केला.
त्यांंनी माफी मागावी...
मंत्री माविन गुदिन्हो यांनी कॉंंग्रेस उमेदवार कॅप्टन व्हिरीयातो फर्नांंडिस यांंच्याबद्दल अपशब्द वापरले. फर्नांंडिस हे लष्करात होते. त्यामुळे त्यांंच्याविरोधात अशा प्रकारचे विधान खपवून घेतले जाणार नाही. गुदिन्हो यांंनी यासाठी त्वरित माफी मागावी तसेच भाजपनेसुद्धा त्यांंच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दिनेश गुंंडू राव यांंनी केली.