शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Goa Election 2022: “तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 9:55 AM

Goa Election 2022: काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून, भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :काँग्रेसने पर्येंत याआधीच प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल.’

काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येंत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

काॅंग्रेसच्या उमेदवारांनी शनिवारी पक्ष सोडणार नाही, अशी जी शपथ घेतली त्याबद्दल विचारले असता चिदंबरम् म्हणाले की, ‘याआधीचा पक्षांतराचा इतिहास पाहता उमेदवारांकडून शपथ घेणे गरजेचे होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा. आम्हाला राज्यात सरकार स्थापन करता यावे, म्हणून सर्व उमेदवारांकडून आम्ही शपथ घेतली.’

दरम्यान, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाने येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यावेळी चिदंबरम्, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर उपस्थित होते.

‘भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या पक्षाने नेहमीच गोव्यातील लोकांसाठी काम केले आहे. भाजपच्या राजवटीत जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे. राज्यात बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात आले पाहिजे, यासाठी काँग्रेसकडे मागणी केली असल्याचे  वारखंडकर म्हणाले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘या पक्षाचे  मांद्रे, पेडणे, थिवी आणि हळदोण मतदारसंघात सक्रिय सदस्य आहेत. जे काँग्रेसला  जिंकण्यास मदत करतील.’ तृणमूलने आमचे नेते पळविले

तृणमूलकडून येत्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव होता. परंतु, एकीकडे पक्षाने हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले. हे योग्य नव्हे, असे चिदंबरम् एका प्रश्नावर म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस