शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Goa Election 2022: विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:09 AM

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर स्वच्छ चारित्र्याचा, छक्के पंजे नसणारा सज्जन तरुण. पक्ष सोडताना त्यांना झालेले दु:ख, वेदना नजरेआड करता येत नाही.

- सदगुरू पाटील

उत्पल पर्रीकर यास मी स्वत: व्यक्तीश: अनेक वर्षे ओळखतो. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी उत्पल लोकमतच्या पणजी कार्यालयात येऊन अनौपचारिक गप्पागोष्टी करायचा. अनेकदा फोनवर बोलायचा. तत्पूर्वी पर्रीकरांविषयी मी पुस्तक लिहित असतानाही अनेकदा उत्पलला भेटलो. उत्पल हा सज्जन तरूण. राजकारणातील छक्के पंजे अजून तो शिकलेला नाही. मात्र त्याचा स्वभाव स्वच्छ असल्याने व तो मनोहर पर्रीकर यांचा मुलगा असल्याने पणजीत व पणजीबाहेरही उत्पलविषयी लोकांना सहानुभूती आहे. वातावरण भावनिक आहे. उत्पलचा स्वभाव हा मनोहर पर्रीकरांपेक्षा कमी व स्वत:च्या आईसारखा जास्त आहे. मध्यमवर्गीय शालीन, सोज्वळ कुटूंबातील एखादा कोणतेही पाप न केलेला युवक जसा असतो, तशी त्याची देहबोली आहे. राजकारणात चिखलफेक जास्त होत असते. कदाचित ती चिखलफेक आपल्या मुलाला सहन होणार नाही असा विचार करून पर्रीकर यांनी उत्पलला राजकारणात आणले नव्हते असे मला वाटते. शेवटी पर्रीकर म्हणतात त्याप्रमाणेच- जर राजकारण स्वच्छ करणार असाल तर राजकारणात उतरावेच लागते. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी टॉयलेटबाहेर उभे राहून चालत नाही असे उदाहरण मनोहर पर्रीकर २००० साली द्यायचे. स्वत: मनोहर पर्रीकरही संवेदनशील होते व त्यामुळे त्यांना स्वत:वर आरोप झाला की, राग यायचा. ते व्यथित व्हायचे. उत्पल राजकारणात पैसे कमावण्यासाठी येत नाही हे मान्य करता येते. मात्र राजकारणात असंगांशीही संग करून पुढे जावे लागते. अंगी बिलंदरपणा असावा लागतो. मनोहर पर्रीकर यांनी राजकारणातील सगळी आयुधे व डावपेच वापरले. मिकी, बाबूश, माविन, विश्वजितसह सर्वांना पर्रीकर यांनी भाजपच्या सोयीनुसार राजकारणातील प्यादी म्हणून वापरले. मात्र पर्रीकर स्वत: कधी भ्रष्ट झाले नाही किंवा त्यांनी स्वत: कधी पक्षांतर केले नाही.

उत्पलची भूमिका गेल्या दोन-तीन दिवसांत अधिक स्पष्ट झाली. आपल्याला अन्य मतदारसंघांमधून लढण्याची ऑफर जरी भाजपने दिली तरी, ती आपण मान्य केली नाही. कारण कशाही प्रकारे एकदाचे आमदार व्हावे अशी आपली भूमिका नाही. आपल्याला पणजीतून बाबूशविरुद्ध लढायचे आहे. भाजपने चांगला उमेदवार दिला तर आपण माघार घेऊ शकतो अशा शब्दांत उत्पलने भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्षाचे पणजीचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनी उत्पलकडून खूप शिकण्यासारखे आहे. कुंकळ्ळीत तिकीट मिळत नाही, म्हणून एल्वीस धावत पणजीत आले व काँग्रेसतर्फे लढत आहेत. अंगावर कपडे नसले तरी, चालतील पण कुठून तरी एकदाची तिकीट द्या अशी स्थिती काही राजकारण्यांची होत असते. उत्पलची स्थिती तशी नाही हे स्वागतार्ह आहे. दिलासादायक आहे.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे बंड व उत्पलचे बंड यांची तुलना होऊ शकत नाही. पार्सेकर यांनी भाजपचे काम करताना आयुष्यात सगळे काही पाहिले, भोगले. मुख्यमंत्रीपद आरामात त्यांच्याकडे चालून आले होते, तेही त्यांनी अनुभवले. भाजपचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष झाले. आमदार, मंत्री झाले होते. आता मांद्रेत भाजपने तिकीट नाकारले म्हणून पार्सेकर यांनी बंड करणे व पणजीत बाबूशविरुद्ध लढावे म्हणून उत्पलने भाजप सोडणे यात तात्त्विक फरक आहे.

भाजप आपल्याला एक दिवस सोडावा लागेल असे उत्पलला कधी वाटलेच नसावे. कारण मनोहर पर्रीकर म्हणजे भाजप असे गोव्यात पंचवीस वर्षे समीकरण होते. मनोहर पर्रीकर यांनी शेकडो राजकारण्यांना भाजपचे तिकीट दिले. त्यापैकी अनेकजण आमदार, मंत्री झाले. आज पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा या उक्तीप्रमाणे उत्पलला घर सोडावे लागतेय, म्हणजे भाजप सोडावा लागतोय. पक्ष सोडताना अनेकजण हसत हसत पक्ष सोडतात, कारण दुसऱ्या पक्षाकडून आकर्षक ऑफर आलेली असते. बाबूशने यापूर्वी अनेकदा अनेक पक्ष सोडले पण उत्पलला पक्ष सोडताना दु:ख झाले, वेदना झाली हे नजरेआड करता येत नाही. मायकल लोबोंना भाजप सोडताना वेदना झाली नाही. विश्वजित राणेंना जिंकल्यानंतर लगेच एका दिवसात काँग्रेस पक्ष सोडताना २०१७ साली दु:ख झाले नाही. दिपक पाऊसकर यांना भाजप सोडताना काही वाटले नाही. बाबू आजगावकर यांना भाजप सोडावा लागला असता तरी त्यांनी हसत तो सोडला असता, त्यांना मगो पक्षाने पुन्हा तिकीट दिले नाही म्हणून भाजपमध्ये नाईलाजाने थांबावे लागले. उत्पलची स्थिती ही वेगळी आहे. त्याच्या जन्मापासून आतापर्यंत त्याने घरात श्वासोश्वास करताना भाजपचेच वातावरण अनुभवले. त्याच्या शरीरात भाजपचेच वातावरण भरून राहिलेले आहे.

उत्पलने १९९४ सालचा दिलेला एक संदर्भ मात्र नवा आहे. आपल्याला आता तिकीट नाकारण्याची घटना ही ९४ सालच्या घटनेसारखीच आहे. त्यावेळी आपल्या वडिलांना भाजपमधून बाहेर घालविण्याचा प्रयत्न झाला होता, असे उत्पलने नमूद केलेय. ही माहिती मात्र प्रथमच उजेडात येत आहे. पर्रीकर म्हापशाचे पण ९४ साली ते पणजीत येऊन पणजी मतदारसंघातून लढले. त्यानंतर पणजी हा पर्रीकरांनी भाजपचा बालेकिल्ला केला. या बालेकिल्ल्यात पर्रीकरांमुळे अनेक भाजप कार्यकर्ते तयार झाले. सिद्धार्थ कुंकळ्ळेकर देखील २००५ साली भाजपमध्येआले.

भाजपच्या कोअर टीमचे सदस्य मात्र सांगतात की- ९४ साली मनोहर पर्रीकर यांना भाजपमधून बाहेर काढण्याचा प्रश्नच आला नाही. पर्रीकर पणजीतून लढण्यास तयार नव्हते, त्यांना पक्षाने पणजीतून लढण्याची खूप विनंती केल्यानंतर मग ते तयार झाले. त्यानंतर मात्र पर्रीकर यांनी मग कधी मागे वळून पाहिले नाही. अर्थात कोअर टीम सांगते ते खरे की खोटे हे कळण्यास मार्ग नाही. मात्र एक खरे की, मनोहर पर्रीकर यांचे पूर्ण जीवन हे संघर्ष करण्यामध्ये गेले. केंद्रात जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अधिकारावर आला तेव्हा तेव्हा पर्रीकर यांच्या वाट्याला गोव्यात जास्त कष्ट आणि संघर्ष आला. एकदा सरकार पाडले गेले तर दुसऱ्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील खाणींचे पर्यावरणविषयक परवाने निलंबित करून टाकले. राज्याकडे आर्थिक बळ नव्हते. केंद्रात जर २०१४ साली मोदी सरकार अधिकारावर आले नसते तर पुढे गोव्यात भाजपचे सरकार टीकलेच नसते. अर्थात तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

पर्रीकर आजारी होते तेव्हा भाजपमधील एक गट पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला काढू पाहतोय अशी उत्पलची भावना झाली होती. सुदिन ढवळीकर यांना अर्थसंकल्प सादर करू द्या असे कोअर टीमने पर्रीकर यांना सांगितले होते. त्यावेळीच पर्रीकर मुंबईच्या इस्पितळातून अचानक गोव्यात आले व त्यांनी पाच मिनिटांसाठी अर्थसंकल्प वाचून दाखवला होता. इस्पितळातून डिस्चार्ज मागून घेऊन ते आले होते. अर्थात हा सगळा इतिहास आहे. पण उत्पलकडेही वडिलांचे तेच फायटिंग स्पिरिट आहे हे आता मान्य करावे लागेल. 

अगोदर तसे वाटत नव्हते. मात्र केंद्रात मोदी-शहा यांची सत्ता असताना उत्पलने गोव्यात बंड केले व भाजप सोडला व आता तो निवडणूक लढवतोय हे धाडस आहे व या धाडसाला नैतिकतेचा आधार आहे. उत्पलने पणजीत बाबूशविरुद्ध व पर्यायाने भाजपविरुद्ध लढण्यासाठी जे मनोबळ एकत्र केले ते लक्षवेधी आहे. दिल्लीत शहा, जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणी करून उत्पल आला होता. कुणीच त्याचे मन वळवू शकले नाही. त्याच्यावर दबाव आणू शकले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात तळ ठोकलेला आहे. उत्पलला अन्य पक्षांची ऑफर होती पण तो अन्य पक्षांमध्ये गेला नाही. अपक्ष राहून लढावे ही उत्पलची भावना भाजपच्या अनेक निष्ठावान समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी उचलून धरली. सोशल मिडियावरून पर्रीकरनीष्ठ भाजप सदस्यांनी उत्पलचे कौतुक केले. अर्थात पणजीत जिंकण्यासाठी एवढे पुरेसे आहे काय? निश्चितच नाही. विशेषत: जेव्हा बाबूश मोन्सेरात भाजपच्या तिकीटावर लढत असतो तेव्हा तो अधिक शक्तीमान व अधिक धोकादायकही असतो. मात्र बाबूश- उदय मडकईकर असे अनेकजण एकत्र आले आहेत. त्यामुळे बाबूशला ही निवडणूक सोपी नाही.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरManohar Parrikarमनोहर पर्रीकर