लोकमत न्यूज नेटवर्क
पर्वरी : पर्वरी मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार, माजी आमदार रोहन खंवटे यांनी चार दिवसांपूर्वी प्रचारास सुरुवात केली आहे. तृणमूल आणि आम आदमी पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाहेरील उमेदवार आणून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, तसे झाल्यास कार्यकर्त्यांसह पक्षातून बाहेर पडू, असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.
पर्वरीत भाजप, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार जोरदार सुरू ठेवला आहे. यात भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. काँग्रेसकडून मतदारसंघात चार-पाच उमेदवार इच्छुक आहेत. दरम्यान, मतदारसंघातून सुकूरचे माजी सरपंच अनिल पेडणेकर यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे.