Goa Election 2022 : महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची देणगी; गोवा काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:49 PM2022-02-01T13:49:31+5:302022-02-01T13:49:52+5:30
भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा चव्हाण यांचा आरोप
पणजी : भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची मुख्य देणगी आहे. भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.
चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे ही मोदी सरकारची मोठी चूक होती. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. मात्र, मोदी सरकार हे लपवत आहे. सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि स्थिती खूपच गंभीर आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत, पण सरकार केवळ जाहिरातबाजीत व्यस्त आहे. लोकांनी भाजप सरकारला घरी पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
LIVE: Press Conference by Former CM Maharashtra, MLA Shri @prithvrjhttps://t.co/48KNxWZH0h
— Goa Congress (@INCGoa) January 31, 2022
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असून, आम्ही स्थिर सरकार देणार आहोत. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही. गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलीटर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिलाध्यक्ष बीना नाईक, सुनील कवठणकर आणि नौशाद चौधरी उपस्थित होते.