शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Goa Election 2022 : ४८ टक्के अल्पसंख्याक मतदारांवर नजर; राज्यातील २४ मतदारसंघातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:24 PM

Goa Election 2022 : राज्यातील सर्व ४० मतदारसंघात निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, यातही जवळपास २४ मतदारसंघात प्राबल्य असलेल्या अल्पसंख्याक मतदारांवर उमेदवारांनी आपली नजर ठेवली आहे. त्यांची मते मिळविण्यासाठी डावपेच आखले आहेत.

किशोर कुबल

पणजी : राजधानी शहराचा समावेश असलेल्या पणजी मतदारसंघात २८ टक्के ख्रिस्ती आणि ८ टक्के मुस्लीम आहेत. मुख्य टपाल कार्यालयाच्या मागील बाजूस, तसेच चर्च स्क्वेअर परिसर ख्रिस्तीबहुल असून, या भागातील मते पारंपरिकपणे काँग्रेस उमेदवारालाच जातात. मिरामार येथील बूथ क्रमांक २६, होम सायन्स कॉलेजच्या २७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरही नेहमीच काँग्रेसला आघाडी मिळते. मतदारसंघात बाबुश मोन्सेरात (भाजप), उत्पल पर्रीकर (अपक्ष) एल्विस गोम्स (काँग्रेस) राजेश विनायक रेडकर (रिव्हॉल्युशनरी गोवन्स), वाल्मिकी नायक (आप) हे प्रमुख उमेदवार व दोन अपक्ष रिंगणात आहेत.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी अनुक्रमे बाबूश मोन्सेरात व एल्विस गोम्स असे ख्रिस्ती उमेदवार दिलेले आहेत. हे दोघे वगळता या मतदारसंघात उर्वरित सर्व उमेदवार हिंदू आहेत. मतदारसंघात ६२४६ ख्रिस्ती मतदार असून, यात १५०० मतदार ख्रिस्ती सारस्वत आहेत. ही १५०० मते आजपर्यंत दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या पारड्यात जात असत. यावेळी ही मते उत्पल यांच्याकडे वळू शकतात. सांतइनेज येथे पालासिओ द गोवा हॉटेलच्या परिसरात मुस्लीम मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून होईल. मात्र, अपक्षांसह इतर उमेदवारांकडेही बहुजन समाजातील मतदारांचा ओढा असेल, असे दिसून येते.

  • राज्यातील २४ मतदारसंघात अल्पसंख्याक समाजातील ख्रिश्चन, मुस्लिम समाजातील मतदारांचे प्राबल्य. 
  • त्यांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी उमेदवारांकडून व्यूहरचना. 
  • `नुवे, बाणावली, वेळ्ळी, कुडतरी आणि कुंकळ्ळी या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या. 
  • कळंगुट, सांत आंद्रे, कुठ्ठाळी, फातोर्डा, नावेली या मतदारसंघात ४० टक्क्यांपर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्या.
  • मत विभागणीसाठी सर्व पक्ष, उमेदवारांचे प्रयत्न.
टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२VotingमतदानElectionनिवडणूक