शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 7:49 PM

उत्पल पर्रीकर पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

Goa Election 2022 Utpal Parrikar: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारलं होतं. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली. तर उत्पल पर्रीकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अशा स्थितीत पणजीची जागेने भाजपपुढे उत्पल पर्रीकर यांचं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, उत्पल पर्रीकरांविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.

"उत्पल पर्रीकर यांना ३-४ जागांची ऑफर देण्यात आली होती, त्यांनी एक जागा निवडायला हवी होती. आमच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना ज्या ३-४ जागांची ऑफर दिली होती, त्यांनी त्या जागेवर निवडणूक लढवायला हवी होती. जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर ते मोठे नेते बनू शकले असते. ते पणजीच्या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी का आग्रही होते, यात त्यांचे काय वैयक्तिक विचार होते याची मला कल्पना नाही," असं सावंत म्हणाले. गोव्यात इंडिया टुडेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मॉन्सेरात यांच्यावरही भाष्य केलं. त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, यासंदर्भात सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला. "ते मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. २००२ मध्येही सरकारात ते मंत्री होते. पणजीच्या जागेवर त्यांची चांगली पकड आहे आणि ते यावेळीही निवडणूक जिंकतील," असं त्यांनी नमूद केलं.

'... त्यावेळी निवडून दिलं नव्हतं'भाजपनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५ टक्के उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "आम्ही पोटनिवडणुकीत स्वच्छ प्रतिमा असलेल्यांना तिकीट दिलं होतं. परंतु त्यांना लोकांनी निवडून दिलं नाही. ट्रॅक रेकॉर्ड असल्यानं कोणी गुंड होत नाही. आता ते सुधरले असतील. तुम्ही पणजीच्या सामान्य जनतेला विचारून पाहा. ते लोकांच्यामध्ये कायम वावरतात. आपल्या लोकांसाठी कामं करतात. ते मोठ्या फरकानं जिंकून येतील. केस असल्याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असा होत नाही. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत