Goa Election 2022: हा केवळ जाहीरनामा नाही, तर २०३५ पर्यंतचे ध्येय; काँग्रेसची गोवेकरांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 05:17 PM2022-02-07T17:17:30+5:302022-02-07T17:18:27+5:30
Goa Election 2022: यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंंग्रेस किमान २४ ते २६ जिंंकणार असा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी केवळ जाहीरनामा प्रसिद्ध केला नसून ते २०३५ पर्यंंत गोव्यासाठीचे ध्येय आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत येताच दर सहा महिन्यांंनी या जाहीरनाम्यातील आश्वासांंची पूर्तता होत आहे का याचा आढावा घेतला जाईल, असे जाहीरनामा समितीचे प्रमुख ॲड. रमाकांंत खलप यांंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मांंडवीतील कॅसिनो ही गोव्याला भेडसावणारी समस्या आहे. मात्र अचानकपणे मांंडवीतून कॅसिनो हटवणे शक्य नाही. त्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. गेमिंंग कमिशन व नियामक संस्था स्थापन तसेच योग्य तो अभ्यास करूनच कॅसिनो या विषयावर तोडगा काढणे शक्य असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले.
ॲड. खलप म्हणाले, की काँग्रेस पक्षाने जनतेला केवळ आश्वासने द्यायला हवीत म्हणून दिलेली नाहीत. ज्या आश्वासनांंची पूर्तता होऊ शकते तीच जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिली आहेत.
सदर जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नसून २०३५ पर्यंंत गोव्यासाठी ठेवलेले ध्येय आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांंची पूर्तता होते याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. गोव्याची जनता ही समाधानी तसेच स्वानंंदी राहावीत यासाठी या जाहीरनाम्यात तरतूद केली आहे. सध्या भाजप सरकारकडून गोव्यात ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतेक योजना या काँग्रेसच्या काळातच सुरू केल्या हाेत्या. भाजपने केवळ त्यात किंंचित बदल केला असल्याचे त्यांंनी सांगितले. यावेळी गोवा कॉंंग्रेसचे निवडणूक प्रभारी पी. चिदंंबरम, प्रभार दिनेश गुंंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व अन्य हजर होते.
भाजपविरोधी मते फुटणार नाहीत याची खात्री
जनता काँग्रेसकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे कॉंंग्रेस या निवडणुकीत किमान २४ ते २६ जिंंकणार असा विश्वास आहे. पक्षाने निवडणुकीत ३७ उमेदवार उभे केले असून, त्यापैकी ३१ चेहरे हे नवे आहेत. भाजपविरोधी मते फुटणार नाही याची खात्री असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांंनी सांगितले.
कायदेशीर खाणी सुरू करू
काँग्रेस सरकार सत्तेत येताच गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू केला जाईल, सरकार स्थापनेच्या एका महिन्याच्या आत त्यासाठीची सर्व प्रक्रिया सुरू केली जाईल. कायदेशीर खाण व्यवसायासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पी. चिदंंबरम यांनी सांंगितले.