- किशोर कुबल
पणजी - ‘२०४५ पर्यंत देशात ऊर्जा वापर दुपटीने वाढेल. लवकरच भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसय्रा क्रमांकावर येईल, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्रीय अर्थसंकल्पातील साधन सुविधांसाठीचा अधिकाधिक निधी वीज क्षेत्रासाठी खर्च केला जाईल, असे ते म्हणाले. मोदी गोवा भेटीवर आले असून बेतुल (मडगांव) येथे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
मोदी म्हणाले की, ‘देशात दुचाकी व चारचाकींची विक्री वाढत असून विक्रम तोडले जात आहेत. इलेक्ट्रिकल वाहनांची मागणी वाढत आहे. ऊर्जा सुरक्षा सप्ताहानिमित्त येथे आम्ही भेटतोय, पर्यावरणीय संवेदनशीलता व स्वयंपोषक भवितव्य याबाबत चर्चा करतोय, ही अत्यंत चांगली बाब आहे. ऊर्जा क्षेत्रात आपला देश अधिक शक्तिशाली होत चालला आहे. घरगुती गॅस वापर वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रात सातत्याने क्षमता वाढवली जात आहे. २०४५ पर्यंत भारताची प्राथमिक ऊर्जा दुपटीने वाढेल.’ मोदी म्हणाले कि,‘ गोवा विकासाच्या बाबतीत बरीच प्रगती करीत आहे. गोवेकरांचे आदरातिथ्य सर्वांसाठीच भारावून सोडणारे आहे.
या प्रसंगी मोदींहस्ते ओएनजीसीच्या ‘सी सर्व्हायव्हल सेंटर’चे उद्घाटनही झाले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘गोव्यात २०२७ पर्यंत शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाईल. २०३५ पर्यंत ६० टक्के सौर आणि पवन ऊजार् निर्मितीची आमचे उद्दिष्ट आहे.