ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 : कलाकिर्ती संस्थेतर्फे कला अकादमीत उद्या शुक्रवारी ह्यगोवा पर्यावरण महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यंदा उर्जा या संकल्पनेवर हा महोत्सव आयोजिण्यात आला आहे. तीन दिवस चालणा-या या महोत्सवात विविध कार्यक़्रम आयोजित करण्यात आले आहे.
महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणप्रेमी संदीप अझरेकर यांना गोवा पर्यावरण महोत्सव पुरस्काराने गौरविण्यात येईल. संतुलित आणि सुरक्षित पर्यावरण या विषयावर पर्यावरण विषयक लघुचित्रपट दाखविण्यात येईल. पर्यावरणाचे विविध पैलू लोकांसमोर मांडणारे चित्रप्रदर्शनाचे यावेळी उद्घाटन होईल.
महोत्सवात कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शने, स्पर्धा, लघुचित्रपट, पथनाटय़ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर सेंद्रीय शेती आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शक चर्चासत्र होईल. सदर चर्चासत्र सर्वासाठी खुले आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
सायंकाळी विद्याथ्र्यासाठी वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ह्यगोष्टीमधून पर्यावरणह्ण या संकल्पनेवर कार्यक्रम होणार आहे. राज्याच्या विविध भागातील शालेय विद्यार्थी या सत्रत सहभागी होतील. पर्यावरणाची गरज, होणार :हास, रक्षण आणि संवर्धन असे विविध विषय घेउन कथानक होईल. तसेच विद्याथ्र्याच्या संकल्पनेतून पर्यावरण जाणण्यासाठी प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन होणार आहे.
27 रोजी सकाळी 7.30 वाजता रोटरॅक्ट क्लब पणजीतर्फे नेचर ट्रेल हा मृण्मयी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणार आहे. या ट्रेकमध्ये साधारण 50 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतर होणा:या ट्रेकमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे साधारण 100 विद्यार्थी सहभागी होतील. सकाळी 9.30 ते 1 र्पयत शालेय विद्याथ्र्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील. या उपक्रमात ह्यटेरीह्ण संस्थेचा सहभाग असेल.
दुस-या सत्रत दुपारी 3 वाजता लायन्स क्लब ऑफ कळंगुटतर्फे वेल्थ आउट ऑफ वेस्ट प्रदर्शन मांडण्यात येईल. दुपारी 3.30 वाजता गोवा आणि म्हादई या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, प्रकाश पर्येकर, संदीप नाडकर्णी, निर्मला सावंत उपस्थित असतील. 4.30 वाजता लोकरंग आणि पर्यावरण या संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता साईनाथ म्हापसा रोट्रॉक्टतर्फे पथनाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
28 रोजी सकाळी 7.30 वाजता पर्यावरण सुरक्षा जागृतीसाठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता पर्यावरण चित्रपट महोत्सवाचा समारोप होईल.