Goa Exit Poll 2022: गोव्यात भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट, बाजी कोण मारणार? एक्झिट पोलमधून दिसला असा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:40 PM2022-03-07T19:40:49+5:302022-03-07T20:25:16+5:30
Goa Assembly Election 2022: गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्येही तसाच कल दिसून आला आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या गोव्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच रंगले होते. भाजपा, काँग्रेस आणि मगोप या प्रस्थापित पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस, आप आणि स्थानिक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्येही तसाच कल दिसून आला आहे. एक दोन अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलनी गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना २०१७ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
गोव्याबाबत टीव्ही नाईन भारतवर्ष-पोलस्ट्रेटने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला १७ ते १९ जा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ११ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये आपला १-४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना २-७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये भाजपाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष ४ जागा जिंकू शकतो. तर इतर पक्षांना ६ जागा मिळू शकतात.
दरम्यान, गोव्याबाबत इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरोने मात्र गोव्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपाला १०-ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोप आघाडीला ३-५ तर इतरांना १ ते ४ जागा मिळू शकतात
टीव्ही ९ भारत वर्ष पोलस्ट्रेट
भाजपा - १७-१९
काँग्रेस - ११-१३
आप - १-४
इतर - २-७
टाइम्स नाऊ
भाजपा १४
काँग्रेस १६
आप ४
इतर ६
इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरो
भाजपा - १०-१४
काँग्रेस -२०-२५
मगोप+ - ३-५
इतर - १-३