शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आयात बंदीमुळे गोव्यात मासे महागले, मासळीच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 6:49 PM

मासे आयात बंदीमुळे गोव्यात माशांचे दर कडाडले आहेत. 

 मडगाव - मासे आयात बंदीमुळे गोव्यात माशांचे दर कडाडले आहेत.   इसवण 680 रुपये किलो, बांगडे 900 रुपये पाटली एवढेच नव्हे तर ताल्र्याचा पाटलीचाही दर 400 रुपये. बाहेरुन येणाऱ्या मासळीच्या आयातीवर बंदी घातल्यावर गुरुवारी पहिल्याच दिवशी या निर्णयाचा फटका काय बसणार याची प्रचिती ग्राहकांना आली. मासळीचे दर किमान 30 टक्क्यांनी वाढलेले गुरुवारी मडगावच्या बाजारपेठेत दिसून आले.मडगाव ही गोव्यातील मासळीची प्रमुख बाजारपेठ असून उत्तर गोव्यातील बडी हॉटेलेही मडगावातूनच मासळी खरेदी करतात. दर दिवशी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात 70 ते 90 टन मासळीची उलाढाल होते. मात्र गुरुवारी केवळ गोव्याच्या रांपणीचे आणि ट्रॉलरचेच मासे बाजारात आल्याने माशांची टंचाई दिसून आली.गुरुवारी सकाळी घाऊक मासळी बाजार एकदम थंड पडलेला दिसत होता. ज्या ठिकाणी घाऊक विक्री होत होती त्या ठिकाणी गुरुवारी किरकोळ मासे विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत होते. बांगडे, तार्ले, सुगंटे व काही प्रमाणात इसवणची विक्री केली जात होती. मासे महाग असतानाही लोकांच्या मात्र त्यावर उडय़ा पडत होत्या.मडगावच्या किरकोळ मासळी बाजारातही इसवण, सुगंटे, कुल्ल्र्या व ताल्र्याची आवक होती. मात्र एरव्ही 500 ते 550 रुपये किलो या दराने मिळणारा इसवण 680 रुपयावर पोहोचला होता. तर 150 रुपये किलो असलेली माणकी 300 रुपयांवर पोहोचली होती. मडगाव मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष फेलीक्स गोन्साल्वीस यांनी, बाजारात मासळी नसल्याने भाव वाढले आहेत आणि भाव वाढल्याने ग्राहकांनाही ते परवडना सारखे झाले आहेत अशी माहिती दिली. बाहेरच्या राज्यातील मासळी न आल्यास ही परिस्थिती अधिकच बिकट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :goaगोवा