पणजी - गोवा फॉरवर्ड पक्षाची महिला राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महिला अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी सरकारने किनारा सफाईचे काम महिला स्वयंसाहाय्य गटांकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत श्रीमती अश्मा म्हणाल्या की, ‘आजवर महिलांना निवडणुकीच्यावेळी केवळ राजकीय सभांसाठी बोलावणे किंवा निवडणुकीच्या कामासाठीच त्यांचा वापर करणे असे प्रकार गोव्यातील राजकीय पक्षांकडून घडत होते. महिलाही राजकारणात यायाला हव्यात आणि गोवा फॉरवर्डमध्ये महिलांना राजकीय प्रतिनिधित्त्वही योग्य प्रकारे मिळेल.’
या पक्षाने महिलांना नेहमीच प्रतिनिधीत्त्व दिलेले आहे. उदाहरणार्थ मडगांवचे नगराध्यक्षपद बबिता प्रभुदेसाई यांच्याकडे आहे. दक्षिण गोवा पीडीए अध्यक्षपदी रेणुका डिसिल्वा आहेत. मडगांव पालिकेत पूजा नाईक या सर्वात तरुण नगरसेविका आहेत. पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीच्याबाबतीत राखीवता मागणार का, या प्रश्नावर थेट उत्तर न देता पक्षाचे नेते महिला कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
फातोर्डा मतदारसंघाचे उदाहरण देताना या मतदारसंघातील महिलो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. एका महिला बचत गटाने मसाला बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने किनारा साफसफाईचे काम महिला बचत गटांकडे देता येईल, असे नमूद करुन अश्मा म्हणाल्या की, तसा प्रस्ताव आम्ही लवकरच सरकारसमोर ठेवणार आहोत. कसिनो मांडवीतून हटवायला हवेत, असे त्या एका प्रश्नावर म्हणाल्या.
पक्षाची महिला राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अश्मा सय्यद - अध्यक्ष, सोनिया फर्नांडिस - उपाध्यक्षा, संपदा पेडणेकर - सरचिटणीस, क्लारा रॉड्रिग्स-संयुक्त सचिव, डॉ. लॉरेना डायस - खजिनदार, श्रृती देऊसकर-उत्तर जिल्हाध्यक्ष, बिंदिया गडेकर-उत्तर जिल्हा उपाध्यक्ष, गौरी गोवेकर-उत्तर जिल्हा सरचिटणीस, पूनम देसाई -दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष, संप्तीका गांवकर-दक्षिण गोवा उपाध्यक्ष, इबतिसाम शेख -दक्षिण गोवा सरचिटणीस, शाझिया कारोल, रेषा दाभोलकर, गुणवंती पेडणेकर, बी. इन्फ्रा वाझ, गुलबशा शेख, सुलेक्षा कळंगुटकर, समिना खान, ममता चौधरी, उन्नती पाडोलकर, सजिदा शाह, शुभांगी नाईक, रझिया कारोल (सर्व कार्यकारिणी सदस्य), महिला गटाध्यक्ष पुढीलप्रमाणे रेषल हरमलकर -शिवोली, रेश्मा कळंगुटकर-साळगांव, मारिया कुएलो - फातोर्डा, शीला घाटवळ - मयें, दिव्या प्रभू्-फोंडा, नाजुका नाईक-कुंकळ्ळी.