पणजी - तंत्रज्ञानाचा पसार इतका वाढला आहे की रोज नवीन ऑनलाईन खेळांची निर्मिती होत असते. मात्र काही खेळ हे जीवेघेणे ठरू शकतात, याची जाणीव अनेकांना ब्लू व्हेल खेळानंतर झाली. जगभरासह देशातही या खेळाने दहशत माजवली होती. या खेळाने काही निष्पाप जिवांचा बळी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता मोमो चॅलेंज हा नवीन लाईन गेम नावरुपास आला असून यावर प्रतिबंध लावण्यासाठी गोवा राज्य संरक्षण बाल हक्क आयोगाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गोवा राज्य संरक्षण बाल हक्क आयोगाने (जीएसीपीसीआर) राज्य शिक्षण विभागातर्फे राज्यभरातील पालक व मुलांना ‘मोमो चॅलेज’ या जीवघेण्या ऑनलाईन गेमविरुद्ध सावधगिरीचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण संरक्षण संस्थेच्या (एनसीपीसीआर) राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली जीएसीपीसीआरचा सल्ला घेण्यात आला आहे. ज्यामुळे जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध राज्य प्राधिकरणांबरोबर योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुलांमध्ये ऑनलाईन सुरक्षतेविषयी जागरुकता करण्यास सांगितले आहे.
एनसीपीसीआरने म्हटले आहे की, मोमो चॅलेंज या खेळाची लिंक व्हॉट्सअॅप, फेसबूक, यूट्यूबवरील सोशल माध्यमांद्वारे मुलांना पाठविली जाते. यात खेळाविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. यामुळे मुलांना ऑनलाईन सुरक्षिततेच्या उल्लंघनाची संभाव्य माहिती देऊन, एनसीपीसीआरने केंद्रीय सरकारमधील संबंधित विभाग, मंत्रालयांना आवाहन केले आहे की ते देशभर या खेळाचा पसार थांबविण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना कराव्यात. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयालाही याविषयी सल्ला दिला आहे.
ऑनलाईन सुरक्षिततेचा भाग म्हणून जीएससीसीआरने जारी केलेल्या सल्लानुसार, या मोमो खेळाने अनेक मुलांचा बळी घेतला आहे आणि हा खेळ मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करते. हा खेळ मोबाईवर खेळला जातो. या दृष्टिकोनातून मुलांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण राज्य निर्देशालयाने जास्तीत जास्त शाळकरी मुले व पालकांमध्ये जागरुकता निर्माण तसेच या खेळाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनासाठी योग्य पाऊल उचलण्यासाठी विनंती केली आहे.
दरम्यान, ब्लू व्हेल चॅलेंज गेमनंतर मोमो चॅलेंज हा दुसरा धोकादायक खेळ उदयास आला आहे. मुलांच्या ऑनलाईन सुरक्षतेसाठी पोलिसांना व इतर एजन्सींना पालकांना सल्ला व मार्गदर्शक तत्त्वे पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.