मडगाव: सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेखाली गोव्यासाठी केंद्राकडून 50 कोटी रुपये मिळणार असून त्याद्वारे प्रत्येकी एक एकर जमिनीचे क्लस्टर करुन त्याद्वारे शेती केली जाणार असल्याची माहिती कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली. खोल पंचायत क्षेत्रत अशाप्रकारचे दोन क्लस्टर लागवडीखाली आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केरळातील नारळ विकास बोर्ड आणि काणकोण विभागीय कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने खोल येथे आयोजीत केलेल्या कृषी मेळाव्याच्यावेळी कवळेकर यांनी ही माहिती दिली. काणकोणात नारळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर आहे. मात्र त्या मानाने उत्पन्न कमी आहे. यावर मात करण्यासाठी कृषी खात्याने विशेष योजना आखली असून नारळाचे उत्पादन कसे वाढवावे यासंबंधात शेतक:यांना मार्गदर्शन केले जाईल असेही त्यांनी सांगितले.या कृषी मेळाव्याला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोलच्या सरपंच पूर्णा नायक, उपसरपंच पंढरी प्रभूदेसाई, पंच सिंथिया फर्नाडिस, तुळशी वैज, गुरु गावकर, गुरु वेळीप, अजय पागी, कृषी खात्याचे उपसंचालक चिंतामणी पेरणी, श्रीराम धायमोडकर, काणकोणचे कृषी विभागीय अधिकारी शिवराम गावकर हे उपस्थित होते.
अशाप्रकारचा पहिला कृषी मेळावा खोतीगाव पंचायत क्षेत्रत आयोजीत केला होता त्यानंतर आता खोल पंचायत क्षेत्रत आयोजीत करण्यातआला असून तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. या मेळाव्याला कृषी खात्याचे सहाय्यक संचालक किशोर भावे, दत्तात्रय पंडित, जेनिस आफोन्सो, निवृत्त कृषी अधिकारी विश्रम गावकर आदींनी शेतक:यांना मार्गदर्शन केले. यावेळी गौतम कामत या प्रगतीशील शेतक:याने आपले मनोगत व्यक्त केले.