शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
2
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
3
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
4
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
5
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप
6
गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी
7
प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."
8
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
9
"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव
10
Rohit Sharmaचं घर आहे जगातील ५० हायराईज टॉवरपैकी एकात; किती आहे किंमत, काय आहेत वैशिष्ट्ये
11
Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."
12
"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक, पोस्ट चर्चेत
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!
14
मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबर घोटाळा, बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटलांचा आरोप
15
डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका
16
मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो
17
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे
18
पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?
19
सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम
20
ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका

मंदिरांच्या १०० मीटर परिसरात दारूच्या दुकानांना सरकारची अनुमती; वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात निषेध

By आप्पा बुवा | Published: June 26, 2024 6:03 PM

ओवैसी यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

फोंडा : शाळा किंवा मंदिरे यांच्या १०० मीटर अंतरात वाढीव शुल्क आकारून अनुमती देण्याचा  निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. रामनाथी, फोंडा येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘कॅसिनोमुळे युवा पिढी बरबाद होत आहे आणि आता शाळा आणि मंदिरे यांच्या १०० मिटर अंतरावर दारूची दुकाने चालू करणे कितपत योग्य ठरणार नाही. हिंदु भाविक जर दारूच्या आहारी गेल्यास तो मंदिरात कदाचित मग जाणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होणार आहे का? महसुलात वृद्धी करायची असल्यास गोवा सरकारने उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडोर, अयोध्या, मथुरा आदींच्या माध्यमांतून धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना दिलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारला आज पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो आणि पर्यटन क्षेत्रात उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. गोव्यात प्राचीन मंदिरे, संस्कृती असतांना दारूच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला निर्णय निदंनीय आहे. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो आणि गोवा सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा. आज भारतातील अन्नपदार्थांस प्रमाणिकरण देणारी संस्था ‘FSSAI’ यांच्या आदेशानुसार शाळाच्या जवळ फास्ट फूड विक्र उभारता येता नाही. शाळांच्या परिसरात फास्ट फूडला विक्री केंद्राला विरोध करणारी सरकार दारूच्या विक्रीच्या दुकानांना कशी परवानगी देते? असाही सवाल त्यानी विचारला आहे.

लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत शपथ घेताना ‘जय फिलीस्तिन (पॅलेस्टाईन) अशीही घोषणा दिली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेत सदस्याने अन्य कुणाल्याही देशाला समर्थन देणे अवैध असून यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते. भारतीय संसदेत शपथ घेतांना अन्य देशांशी निष्ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे, तसेच हा भारताचा अपमान आहे. त्यामुळे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र निषेध व्यक्त करून लोकसभेचे सभापती आणि केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री यांच्याकडे असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.  आज ‘जय पॅलेस्टाईन म्हणणारे उद्या ‘जय हमास’ आणि त्याही पुढे जाऊन ‘जय पाकिस्तान’ म्हणण्यासही कमी करणार नाहीत. त्यामुळे ओवैसी यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा