शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

गोवा सरकार उद्योगपतींचे - केजरीवालांचा हल्लाबोल

By admin | Published: June 28, 2016 11:01 PM

गोवा सरकार समुद्रकिनारी असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या हिताविरोधात असल्यानेच गोव्यातील मासळी विक्रेते व व्यावसायिक भाजप सरकारला वैतागले आहेत. हे सरकार सर्वसामान्य

वास्को : गोवा सरकार समुद्रकिनारी असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या हिताविरोधात असल्यानेच गोव्यातील मासळी विक्रेते व व्यावसायिक भाजप सरकारला वैतागले आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे नसून मोठय़ा उद्योगपतींचे आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा सरकारवर हल्लाबोल केला.मंगळवारी वास्को येथील दक्षिण-पश्चिम रेल्वे सभागृहात गोव्यातील पारंपरिक मच्छीमार व व्यावसायिकांच्या सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत ह्यगोवा रांपणकार एकवोटह्णचे ओलेन्सियो सिमांस, फादर मयाकल फर्नाडिस, क्रिस्टोडियो डिसोझा, पंढरी केरकर, सुदेश शेट, वसंत नाईक, कारिदाद परेरा, नबार पागी, संजय परेरा, सय्यद कादरी व गोव्याच्या कानाकोप:यातील मासळी व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.केजरीवाल म्हणाले की, येथील भाजप सरकार पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांना त्यांचे हक्क देऊ शकत नाही. हे सरकार जनतेला त्यांच्या गरजा कसे पुरवणार? त्यासाठी गोमंतकीयांनी येणा-या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून द्यावे. आमचे सरकार पक्षाचे नसून सर्वसामान्य व गरीब जनतेचे असेल. त्यांच्यामधील एक व्यक्ती गोव्याचा मुख्यमंत्री असेल.येथील मासळी विक्रेते ही गोव्याची ओळख आहे. सरकार ती पुसून टाकण्याच्या विचारात आहे. हे सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने येथील संस्कृती व पारंपरिक मासळी व्यवसाय नष्ट करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने जागरूक होऊन एमपीटी व केंद्रीय जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना जाबा विचारायला हवा. भाजप व काँग्रेस यांच्यातील साटेलोटय़ामुळे सामान्य माणूस चिरडला जात आहे. ही पिळवणूक संपवायची असेल, तर पुढील विधानसभेत आम आदमी पक्षाला सत्तेवर आणणे हा एकमेव मार्ग आहे.यावेळी अनेक मच्छीमार संघटनांच्या पदाधिका-यांनी आपल्या समस्या मांडल्या व केजरीवाल यांना निवेदन दिले. यावेळी केजरीवाल यांनी स्व. फादर बिस्मार्क यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.सूत्रसंचालन संदेश तेलेकर यांनी केले. स्व. माथानी साल्ढाणा यांचे भाचे आलेन्सियो सिमांस यांनी, राज्य सरकारने मच्छीमार व्यावसायिकांच्या केलेल्या छळाची व्यथा मांडली. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.यावेळी वास्कोचे आम आदमीचे माजी प्रवक्ते चंद्रशेखर वस्त यांनी सभागृहाबाहेर राहून ह्यआम आदमी पक्ष गरीबांचा नसून श्रीमंतांचा आहे,ह्ण असे लिहिलेले फलक हातात घेऊन निषेध केला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वास्कोचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल व पोलीस मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)क्रिस्ती नागरिकाच्या घरी भोजनकेजरीवाल यांनी दुपारी खारीवाडा येथे क्रिस्टोडियो डिसोझा यांच्या घरी जेवण घेतले. त्यानंतर ते मिस्किलपणे म्हणाले की, मला आज मासळी नसलेले जेवण मिळाले. कारण मी शुद्ध शाकाहारी आहे व त्यासाठी डिसोझा कुटुंबीयांनी माङयासाठी शाकाहारी जेवण केले होते. मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे.