सदगुरू पाटीलपणजी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी होणार आहे. अवघ्या सात दिवसांवर हा आंतरराष्ट्रीय सोहळा येऊन थांबला आहे. गोवा मनोरंजन संस्था आणि एनएफडीसी तसेच चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) त्यासाठीच्या तयारीच्या कामात पूर्णपणे व्यस्त आहे. मात्र गोवा सरकार यावेळी इफ्फीमध्ये मुळीच गुंतून पडलेले नाही.
पूर्वी प्रत्येक पक्षाचे सरकार हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पूर्णपणो गुंतून राहत होते. यावर्षी प्रथमच असे गुंतणे थांबले आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात अधिकारावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी पार पडला. पहिले चार महिने खाते वाटप, पंचायत निवडणुका, विधानसभेच्या पोटनिवडणुका तसेच प्रशासनाची घडी नीट बसविणो यावरच गेले. अवघ्या चार महिन्यांचा काळ पर्रीकर सरकारला काम करण्यासाठी मिळाला आहे. अशावेळी इफ्फीमध्ये सरकार गुंतून राहिले तर प्रशासन पूर्णपणो इफ्फीमय होईल व इफ्फीवरच सगळा भर राहिल हे मुख्यमंत्र्यांनी ओळखले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत:ही यावेळी इफ्फीविषयक कामांमध्ये रस घेतलेला नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे मनोरंजन संस्थेचे तांत्रिकदृष्टय़ा अध्यक्ष आहेत पण त्यांनी सगळे काम उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्यावरच सोपवले आहे. गोवा मनोरंजन संस्थाच स्वतंत्रपणो व सरकारवर अवलंबून न राहता सध्या इफ्फीविषयक तयारी पुढे नेत आहे. तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पणजीत इफ्फीचा माहोल तयार झाला आहे. विविध छोटय़ा सुविधा इफ्फीनिमित्त पणजीत आता उभ्या करण्यात आल्या आहेत. येत्या सहा दिवसांत तयारीचे शंभर टक्के काम पूर्ण होणार आहे.
पूर्वी गोवा सरकारचे अनेक मंत्री आणि भाजपाचे बरेच कार्यकर्तेही इफ्फीविषयक कामांमध्ये रस घेत असे. मुख्यमंत्री तर वारंवार मनोरंजन संस्थेला भेट देणो, संस्थेच्या बैठका घेणो वगैरे कामे करत असे. तसे आता काही घडत नाही. कलाकारांना यामुळे स्वातंत्र्य मिळते. गोव्यात इफ्फीचे आयोजन कसे करावे याविषयीचा अनुभव गेल्या दहा इफ्फीच्या यशस्वी आयोजनांमधून मनोरंजन संस्थेला मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने आता थेट लक्ष घालण्याचे मोठेसे कारणही राहिलेले नाही. जगभरातून सुमारे आठ हजार प्रतिनिधी इफ्फीमध्ये भाग घेणार आहेत. अनेक बॉलिवूडचे कलाकार तसेच दक्षिणोकडील चित्रपटसृष्टीचे कलाकार इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा मनोरंजन संस्था खपत आहे. 2019 साली होणा-या पन्नासाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दोनापावल येथे मोठा प्रकल्प बांधला जाणार आहे. त्या कामाची आखणी सरकारने केली आहे.