शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

गोवा : म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, मात्र पाणी मलप्रभेत वळविण्यास विरोध - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 6:59 PM

म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, परंतु पाणी मलप्रभेत वळविण्यास मात्र विरोध असल्याचे प्रदेश भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे कोळसा हाताळणीच्या बाबतीत अदानींना काँग्रेसच्या काळातच परवाने दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.

पणजी : म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, परंतु पाणी मलप्रभेत वळविण्यास मात्र विरोध असल्याचे प्रदेश भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे कोळसा हाताळणीच्या बाबतीत अदानींना काँग्रेसच्या काळातच परवाने दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.

प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक, प्रेमानंद म्हांबरे, माजी आमदार सुभाष फळदेसाई, किरण कांदोळकर यानी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दत्तप्रसाद म्हणाले की, कर्नाटकच्या हद्दीत म्हादईचे ३५ किलोमिटर खोरे आहे. तेथे ते पाणी वापरत असतील तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही. परंतु म्हादईचे पाणी जर मलप्रभेत वळविण्यात येत असेल तर त्याला विरोध राहील.  

अदानी यांच्याशी भाजपचा संबंध असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा आरोप फेटाळून लावताना उलट अदानींना काँग्रेसच्या काळातच कोळसा हाताळणीसाठी परवाने देण्यात आल्याचा आरोप दत्तप्रसाद यांनी केला. केंद्रात संपुआचे सरकार आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते तेव्हाच हे परवाने देण्यात आल्याचा दावा करताना त्यांनी तारखाही सादर केल्या. रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन-२८ एप्रिल २00८, बोली स्वीकारली-३0 जून २00९, कन्सेशनरची निवड-४ आॅगस्ट २00९, आॅफरपत्र-७ आॅगस्ट २00९, कन्सेशनवर सह्या-२२ सप्टेंबर २00९ व विस्तारकामाची सुरवात-१५ मे २0१0 अशा तारखा सादर करुन काँग्रेसनेच अदानींना परवाने दिल्याचा दावा त्यांनी केला. २0१३ साली काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी अदानी कंपनीला नियम बाजुला ठेवून पर्यावरणीय परवानाही दिल्याचे दत्तप्रसाद यांनी नमूद केले. 

नवीन जिंदाल यांच्या साउथ वेस्ट पोर्ट लि, कंपनीलाही काँग्रेसच्या काळात नरसिंह राव पंतप्रधान असताना परवाने दिल्याचा आरोप करण्यात आला. 

राज्याचा आर्थिक डोलारा ढासळला असल्याचा आरोपही फेटाळून लावण्यात आला. २0१६­-१७ ची आर्थिक तूट ९३४ कोटी ६३ लाख रुपये होती. शांताराम यांनी दिलेला आकडा चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला. कसिनोंकडून महसूल मिळत नाही हा आमदार रेजिनाल्द यांनी केलेला दावाही फेटाळून लावण्यात आला. 

राज्य सहकारी बँकेच्या २00७ पासूनच्या कारभाराची चौकशी करा : सुभाष फळदेसाई 

राज्य सहकारी बँकेबाबत रेजिनाल्द यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना माजी आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले की, बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. बँकेवर प्रशासक नेमलेला असून बँक नफ्यात आहे. बँकेत २00७ ते २0११ या कालावधीतच घोटाळे झालेले आहेत, असा दावा करुन सत्य बाहेर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हवे असेल तर २00७ पासून आजपर्यंतच्या कारभाराची सर्व चौकशी करावी, असे आव्हान फळदेसाई यांनी दिले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा