पणजी : काही राजकीय पक्ष खोटारडेपणा करूनभीती पसरवण्याचे राजकारण करीत आहेत, अशी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'गोव्यात ख्रिस्ती व इतर बांधव ज्या पद्धतीने सलोख्याने राहत आहेत ते 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चे उत्तम उदाहरण आहे. एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आलेले मोदी यांनी मडगाव येथे विराट अशा जाहीर सभेत संबोधले. या सभेला हजारो लोकांची उपस्थिती लाभली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फुलांचा भला मोठा हार मोदींना घालून त्यांचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, 'गोवा देश- विदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय व पसंतीचे ठिकाण आहे गोव्याला स्वतःची ओळख व अस्मिता आहे अनेक कलाकार व संत, महंत गोव्यात जन्मले.'
मोदी म्हणाले की, 'आम्हाला गोव्यात कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे. गोवा लॉजिस्टिक हब बनवायचा आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून जागतिक पर्यटन स्थळ म्हणून राज्य विकसित करायचे आहे. ' 'गोवा 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून विकसित करू'मोदी पुढे म्हणाले की, ' गोव्याने जागतिक दर्जाचे इव्हेंट्स घडवून आणले. त्यामुळे जगभरात गोव्याचे नाव झाले आहे. डबल इंजिन सरकार गोव्याला आकर्षण केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोवा 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून आम्ही विकसित करू.'