शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

शेजारचे करतायेत महाराष्ट्रातील राजकीय नाट्ट्याची चर्चा, गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मोठा रस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 1:14 PM

एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे

पणजी : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये प्रथमच गोव्यातील सर्वपक्षीयांमध्ये मोठा रस निर्माण झालेला आहे. सर्वच पक्षांचे नेते व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चवीने चर्चा करू लागले आहेत. गोव्यातही भाजपची सत्ता आहे व भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी गोव्यातही अलिकडे काही आमदार फुटल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे गोव्यातील प्रत्येकजण उत्सुकतेने पाहतो व गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोनातून त्या घडामोडींचा बहुतेकजण अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे. फक्त अमुक एका पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार अधिकारावर आले एवढे कळले की, पुरे अशी भावना गोमंतकीयांमध्ये असायची. मात्र गोव्यात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्च 2क्17 पासून आतार्पयत तेरा काँग्रेस आमदार फुटले. त्या शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोघे फुटले. एकूण पंधरा आमदार भाजपच्या प्रभावाखाली येऊन फुटल्याने गोव्यातील मगो पक्ष महाराष्ट्रातील शिवसेनेला सध्या आपल्या जागी पाहतो. आपण गोव्यात भाजपला धडा शिकवू शकलो नाही, शिवसेनेने तरी तो शिकवावा या अपेक्षेने गोव्यातील मगो पक्षाचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रातील घडामोडींकडे पाहत असल्याचे दिसून येते.गोवा फॉरवर्ड आणि मगो व एक-दोन अपक्ष भाजपप्रणीत आघाडी सरकारसोबत होते. मनोहर र्पीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यातील राजकीय स्थिती बदलण्यास आरंभ झाला व भाजपने मगोप आणि गोवा फॉरवर्डसह अपक्ष रोहन खंवटे यांनाही दूर केले. त्यामुळे दुखावलेले हे तिन्ही घटक महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर राहतोय यात आनंद मानून घेत असल्याचे जाणवते. राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा संघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे, गोव्यातील प्रादेशिक पक्ष या संघर्षातील प्रत्येक टप्प्याकडे बारीक लक्ष देऊन पाहत आहेत. मात्र गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीवर समाधानी आहे. भाजपने आपण सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका घेऊन चांगले केले, सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तर पुढील काळात भाजपलाच लाभ होईल अशी भावना गोव्यातील भाजपमध्ये आहे.मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की भाजपने कायम प्रादेशिक पक्षांचा वापर केला. शिवसेनेला सरकारमध्ये राहून यापूर्वी भाजपकडून जी वागणूक मिळाली, तिच वागणूक मगो पक्षाला गोव्यात मिळाली. काँग्रेसचे प्रथम दोन आमदार भाजपने फोडले व त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपची ती नीती अत्यंत चुकीची होती. भाजप सरकार स्थापन करताना ज्या पक्षांचा आधार घेतो, त्या पक्षांना तो मित्रपक्ष म्हणतो पण मित्रपक्षांना दिलेला शब्द भाजप कधीच पाळत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात त्यांच्या वाटय़ाला नामुष्की आली आहे. भाजपचे स्वार्थाचे राजकारण हे छोट्य़ा पक्षांसाठी घातक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे विविध अर्थानी पहावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपा