पणजीः सरकारच्या विरोधी भूमिका घेतलेले अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या बुधवारी रात्री केलेल्या अटकेचा निषेध करून विरोधी सदस्यांनी गोवा विधानसभेचे कामकाज रोखून धरले. कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.
आमदार खंवटे यांना एका भाजपा नेत्याला धमकी देण्याच्या प्रकरणात बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती व नंतर जामीनवर सुटकाही करण्यात आली होती. हा प्रकार विधानसभा भवनामध्ये घडला होता. त्यामुळे सभापतीच्या आदेशावरून अटकेची कारवाई झाली होती, असे स्पष्टीकरणही सभापती पाटणेकर यांनी कामकाज रोखून धरल्यानंतर विरोधकांना दिले होते. मात्र, त्यावर समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभापतीच्या पटलाकडे धाव घेतली. गदारोळ करून सभागहाचे काम रोखून धरले. सभापतींनी अर्धा तास कामकाज तहकूब केल्याची घोषणा केली.
गुरूवारी 11.30 वाजता कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा विरोधी सदस्य भूजाला काळे फित बांधूनच सभागृहात आले होते. सभापती पाटणेकर सभागृहात आल्यानंतर कामकाज सुरू करण्यापूर्वीच विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण